शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

“संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा, दंगलीची माहिती घ्या”; नितेश राणेंचे ATS प्रमुखांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 10:16 IST

Maharashtra Politics: संजय राऊतांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरुन देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल, असे नितेश राणेंनी पत्रात म्हटले आहे.

Maharashtra Politics: राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांकडून सरकारवर टीका होताना दिसत आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराचे उद्घाटन आणि दंगलींबाबत मोठा दावा केला. यावरून आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी थेट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (ATS) सदानंद दाते यांना पत्र लिहिले असून, संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

नितेश राणे आपल्या पत्रात म्हणतात की, अयोध्येतील प्रभू श्रीराम चंद्र जन्मभूमीचा तिढा न्यायालयीन प्रक्रियेतून शांततेत सोडवला गेला आणि आता मंदिर उभारणीचा संकल्पही सर्व जाती धर्माच्या सहकार्याने आनंदाने पुर्णत्वास जात आहे. लोकार्पण सोहळा  तारीख  जशी जशी जवळ येतेय तसा देशात आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे. अशावेळेस वारंवार सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करत आहेत. त्यात सर्वात अग्रक्रमी राज्यसभेचे खासदार व  सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत हे मे २०२२ पासून महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील अशा वारंवार बातम्या माध्यमातून पसरवत आहेत. 

संजय राऊत यांची देशविरोधक संघटनेशी जवळीक असावी 

त्यांच्या विधानानंतरच महाराष्ट्रात अचानक काही लोकांनी औंरगजेबाचे फोटो स्टेटस म्हणूनही ठेवले आणि त्यामुळे काही भागात दंगलीसुद्धा घडल्या. त्यामुळेच दि.२८ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांनी माध्यमांपुढे विधान केले की, “राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावले जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवले गेलेय असे म्हटले जातेय. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल.” त्यामुळेच त्यांचे हे विधान मला चिंतेत टाकणारे आहे. मला खात्री आहे की, देशविरोधक संघटनेशी त्यांची जवळीक असावी आणि भारत देशाविरूद्ध संभाव्य कटकारस्थान रचल्या जाणाऱ्या षडयंत्रांचा ते भाग असावेत म्हणूनच त्यांना संभाव्य दंगलीची एवढी सखोल माहिती आहे, असा दावा नितेश राणे यांनी पत्रात केला आहे. 

संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी

संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि पाकिस्तानची तारीफ करणाऱ्या वृत्तींना ते आपला आदर्श समजतात. माझी आपणास विनंती आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडे असलेली संभाव्य दंगलीची अचूक माहिती प्राप्त करावी आणि आवश्यकता वाटल्यास  न्यायलयीन प्रक्रियेतून त्यांची नार्को टेस्टही करावी जेणेकरून दहशवादी संघटनाचे जाळे नष्ट करून देशावर येणारे संभाव्य संकट टाळता येईल, असे नितेश राणे यांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख सदानंद दाते यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतAnti Terrorist Squadएटीएस