शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

बाळासाहेबांच्या नावाला उद्धव ठाकरे कलंक; भाजपा आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:39 IST

बाळासाहेबांना म्हातारा म्हणून उल्लेख करायचे. बाळासाहेबांना प्राण्याची उपमा देऊन हाक मारायचे हे मी शपथ घेऊन सांगतो असा दावा नितेश राणेंनी केला.

मुंबई – बाळासाहेब ठाकरेंनी, प्रबोधनकार ठाकरेंनी ज्या ठाकरे नावाला महाराष्ट्रात मोठे केले त्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कलंक लावण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसांवर नाव ठेवतायेत. कारण आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार आहे हे माहिती आहे. आदूबाळ लवकरच आर्थररोड जेलमध्ये जाणार आहे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

आमदार नितेश राणे म्हणाले की, सुशांतसिंग राजपूतचे चूक काय? दिशा सालियनच्या मृत्यूला जबाबदार कोण? ज्या ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंच्या विचाराला विरोध केला त्यांना मारून टाकण्याचे आणि त्यांचे कार्यालय तोडण्याचे काम केले. ३९ वर्ष आम्ही शिवसेनेत होतो. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात कसा त्रास दिला हे पुराव्यासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणू. उद्धव ठाकरेंनी यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर याद राखावे असा इशारा त्यांनी दिला.

तसेच बाळासाहेबांना म्हातारा म्हणून उल्लेख करायचे. बाळासाहेबांना प्राण्याची उपमा देऊन हाक मारायचे हे मी शपथ घेऊन सांगतो. देवेंद्र फडणवीसांनी रक्ताच्या भावापेक्षा जास्त उद्धव ठाकरेंना सांभाळले. मातोश्री २ च्या परवानगी कुणी आणून दिल्या. २०१४-१९ काळात उद्धव ठाकरेंचे लाड पुरवले. रक्ताच्या भावाची काय अवस्था उद्धव ठाकरेंनी केली हे आम्ही महाराष्ट्राला सांगितले तर जनता चप्पलाने मारेल. नीच प्रवृत्तीचा व्यक्ती दुसऱ्याला कलंक लावतो. बाळासाहेबांच्या भाषेत काँग्रेससोबत जाणारे हिजडे आहेत. सर्व शासकीय यंत्रणा बाजूला ठेव, आम्ही कलानगरमध्ये येऊन उभे राहतो दाखव तुझी मर्दानगी असंही आमदार नितेश राणेंनी म्हटलं.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची क्लिप लोकांना ऐकवत अरे तुमच्या नागपूरला कलंक आहे हा.. नाही नाही नाही म्हणजे हो हो हो असा त्याचा अर्थ. सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी फडणवीस यांची स्थिती झाली आहे, असे काय हे नागपूरवर कलंक आहे. शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून धमकावले जात आहे. तुरुंगात टाकले जात आहे. हे आता चालणार नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्ही मनमानी कराल तर छत्रपतींच्या संस्काराची तलवार तुमच्यावर चालवावी लागेल असा इशारा देत ठाकरेंनी फडणवीसांवर बोचरी टीका केली होती.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस