शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर? बड्या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “सब कतार में है”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 12:17 IST

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे खळं उठवलंय, वस्ती उठायला वेळ लागणार नाही. योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम होईल, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ता स्थापन केल्यापासून भाजपने पुन्हा आपले मिशन लोटस सुरू केल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातच आता विधान परिषदेची निवडणूक जिंकून पुन्हा सभापतीपदी विराजमान झालेले रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. एका भाजप नेत्याने याबाबत सूतोवाच केले असून, अनेक जण रांगेत उभे आहेत, असा मोठा दावा केला आहे. 

कोरेगाव विधानसभा मतदासंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर भाष्य केले. जिल्ह्यात रामराजेंच्या भाजप प्रवेशावर जोरदार चर्चा सुरू आहेत, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे खळ उठलेय, वस्ती उठायला जास्त वेळ लागणार नाही, असा सूचक इशारा दिला. ते साताऱ्यात बोलत होते.

सब कतार में है...

राष्ट्रवादीचे खळ उठवले आहे, वस्ती उठायला वेळ लागणार नाही, आता बोजा बिस्तरा गुंडाळायला जास्त वेळ लागणार नाही, असा टोला लगावत, आमच्याकडे मोठी रांग लागली आहे. त्यामुळे सब कतार मै है, योग्य टायमिंग आल्यावर ते कार्यक्रम करतात. ज्यांना दादागिरीपासून मुक्तता पाहिजे, खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, अशा सगळ्यांना मुख्यमंत्री सोबत घेतील अशी खोचक टीका महेश शिंदे यांनी केली.

दरम्यान, रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज आहेत. विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर हे भाजप आमदार आहेत. नार्वेकर सध्या विधानसभा अध्यक्षपदावर विराजमान आहेत. विधानपरिषदेच्या सभापतीपदी सासरे, तर विधानसभा अध्यक्षपदी जावई अशी जोडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जावयापाठोपाठ सासरेही भाजपमध्ये येणार का, याची चर्चा आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा