शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा एकेरी उल्लेख, रोहित पवारांवरही बरसले; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:43 IST

जेजुरी संस्थानने अहिल्यादेवींचा पुतळा गडावर बसवला. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही असं पडळकरांनी म्हटलं.

सोलापूर - गेल्यावर्षी ३१ मे रोजी शरद पवारांनी चौंडीत जाऊन अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यंदा शरद पवार का आले नाहीत. ४ वेळा मुख्यमंत्री होते, १२ वर्ष केंद्रात मंत्री होते. १९९९ पासून राज्यात त्यांचे सरकार होते. एकदाही आले नव्हते. गेल्यावर्षी चौंडी त्यांना आपल्या हातातून काढून घ्यायची होती. परिवर्तनाचे केंद्र जागरूक ठेवले पाहिजे असं सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकेरी भाषेत पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, जेजुरी संस्थानने अहिल्यादेवींचा पुतळा गडावर बसवला. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी होळकरांची आहे. ते मंदिर होळकरांनी बांधले. एका वृत्तपत्रात अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे पाहणी करताना शरद पवारांचा फोटो पाहिला. माझ्या डोक्यात विचार आला काहीतरी गेम सुरू आहे. त्यानंतर १५ दिवसांनीच शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण होणार, त्यांचा संबंध काय, कारण आम्ही काहीतरी करतोय हे पवारांना दाखवायचे होते. आमची भावना चांगली आहे असं दाखवायचे होते. म्हणून आम्ही तो प्रकार हाणून पाडला. कुणालाही काही न समजता पहाटे ५ वाजता पोरं जेजुरी गडावर पोहचली. पहाटेच उद्धाटन करून टाकले असं त्यांनी सांगितले. 

तसेच चौंडीतही तेच करायचे होते. चौंडी हायजॅक करायची होती. सांगलीतही तेच केले. अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी हजारो पोलीस बंदोबस्ताला लावले. आपल्या अशोक मरगळे यांनी मेंढपालाच्या हस्ते उद्धाटन केले. हा डावही आम्ही हाणून पाडला. मागच्यावर्षी पळताभुई केली होती. कारण माझ्यासोबत तुम्ही होता. राजकारण वेगळे असते पण आपल्या अस्मितेला माणूस हात घालतो. केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जागरूक झाले पाहिजे असं आवाहनही गोपीचंद पडळकर यांनी केले. 

रोहित पवारांवरही घणाघात चौंडीच्या कार्यक्रमात मी प्रसाद वाटत होतो असं रोहित पवार सांगतात, तुम्ही आता प्रसाद वाटायच्या कामाला आहे. आमच्या लोकांनी आयुष्यभर तुला प्रसाद वाटला आणि तू वाट की दुखतंय का? प्रसाद वाटल्याचे टीव्हीवर सांगायचे असते. धनगर किती बकरे कापतात हे माहिती नाही का तुला. धनगर उपाशी आले होते का तिथे? मी प्रसादाचे काम बघत होतो ते रोज सांगतोय. दरवर्षी वाट, परिवर्तन झाले पाहिजे असा टोला गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांना लगावला. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवार