शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

पवारांच्या पोपटाचा लेख वाचला आणि....; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:32 IST

सामना अग्रलेखावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा दाखला देत राऊतांवर टीकास्त्र सोडले.

मुंबई – पटणा, बंगळुरूनंतर  इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीचं नियोजन उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. इंडियाच्या बैठकीसाठी देशातील २८ पक्षाचे प्रमुख नेते मुंबईत आले होते. या बैठकीत मोदी सरकारविरोधात रणनीती ठरवण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी जिथे शक्य असेल तिथे एकत्रित निवडणूक लढवण्याचा ठराव समंत झाला. या बैठकीनंतर सामना अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली होती. त्यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, पवारांच्या पोपटाचा सामनाचा लेख वाचला आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवला “‘गाढव शृंगारीले कोडे।काही केल्या नोहे घोडे॥ त्याचे भुकंने न राहे।स्वभावासी करील काय॥ श्वान शिबिके बैसवीले।भुंकता न राहे उगले॥ तुका म्हणे स्वभाव कर्म।काही केल्या न सुटे धर्म॥ असं ट्विट करत त्यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना टॅग केले आहे.  

काय म्हटलं होतं सामना अग्रलेखात?

चार गाढव एकत्र चरत असले तरी हुकुमशाहाला दरदरून घाम फुटतो, त्याला वाटते की, आपल्याविरुद्ध कारस्थाने करून सत्ता उलथवीत आहेत. इकडे मुंबईत तर देशाच्या राजकारणातील २८ प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते २ दिवस एकत्र जमले. त्यांनी देशातील हुकुमशाही राजवट उलथवून टाकण्याचा एल्गार केला. त्यामुळे मोदी सरकारला इंडियाची धास्ती वाटणारच. इंडिया आघाडीचे युद्ध हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात आहे असं सामना अग्रलेखात म्हटलं होतं.

त्याचसोबत सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचवण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना चले जाव, भारत छोडोचा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून हुकुमशाही चले जावचा आदेश इंडिया आघाडीने दिला आहे. इंडिया जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाहीचा विजय होईल. स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापी संपलेले नाही असंही त्यात नमूद केले होते.

 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSanjay Rautसंजय राऊतINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा