शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

भाजपाच्या आमदाराने मागितली लाच, आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम यांची ऑडिओ क्लीप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 10:30 PM

भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन देणाऱ्या भाजपाच्या आमदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. भाजपाचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर मतदारसंघातील आमदार राजू तोडसाम यांनी एका ठेकेदाराकडे अप्रत्यक्षरित्या लाच मागितल्याचे समोर आले आहे.

यवतमाळ, दि. ७ -आर्णी-केळापूर मतदारसंघाच्या भाजपा आमदाराने आपल्या मतदारसंघात कामे करणाºया कंत्राटदाराला मोबाईलवरून ‘रॉयल्टी’ची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संभाषणाची आॅडिओ क्लीप गुरुवारी व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी बुधवारी दुपारी ९३७२०७९५९५ या क्रमांकाच्या मोबाईल फोनवरून शिवदल लखीमचंद शर्मा, रा. सत्यनारायण ले-आऊट यवतमाळ, यांच्या ९४२२१६८९७८ या मोबाईल क्रमांकावर फोन केला. शर्मा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला. सुरूवातीला आमदारांनी कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. कामाची बिले का थांबली, अशी विचारणा केली. त्यावर कंत्राटदाराने बिले का थांबली, असे विचारताच बांधकामच्या अधिकाºयांनी सांगितले नाही काय, माझ्या मतदारसंघात काम करायचे असेल, तर माझे काम करावेच लागेल, असा दम शर्मा यांना भरला. शर्मा यांनी माझा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाल्याने तो कोमात आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही, असे उत्तर दिले. तसेच पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे तक्रार करतो, असे म्हणताच आमदार भडकले. त्यांनी पालकमंत्रीच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांकडे जा, अशा शब्दात शर्मा यांना दम भरला.

शर्मा यांनी केळापूर मतदार संघातील पांगडी, दडपापूर, घोटी, उमर पोड येथे रस्ता डांबरीकरण, घाट कटिंग, अशी ४५ लाखांची कामे केली. या कामांची काही देयके बांधकाम विभागाने दिली. उर्वरित देयके थांबविण्यात आली. ही देयके हवी असतील तर माझे काम करा, असा फोन त्यांना आल्याचे या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकायला येते.दुपारी ९३७२०७९५९५ या क्रमांकाच्या मोबाईल फोनवरून शिवदल लखीमचंद शर्मा, रा. सत्यनारायण ले-आऊट यवतमाळ, यांच्या ९४२२१६८९७८ या मोबाईल क्रमांकावर फोन केला. शर्मा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला. सुरूवातीला आमदारांनी कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. कामाची बिले का थांबली, अशी विचारणा केली. त्यावर कंत्राटदाराने बिले का थांबली, असे विचारताच बांधकामच्या अधिकाºयांनी सांगितले नाही काय, माझ्या मतदारसंघात काम करायचे असेल, तर माझे काम करावेच लागेल, असा दम शर्मा यांना भरला. शर्मा यांनी माझा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाल्याने तो कोमात आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही, असे उत्तर दिले. तसेच पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे तक्रार करतो, असे म्हणताच आमदार भडकले. त्यांनी पालकमंत्रीच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांकडे जा, अशा शब्दात शर्मा यांना दम भरला.शर्मा यांनी केळापूर मतदार संघातील पांगडी, दडपापूर, घोटी, उमर पोड येथे रस्ता डांबरीकरण, घाट कटिंग, अशी ४५ लाखांची कामे केली. या कामांची काही देयके बांधकाम विभागाने दिली. उर्वरित देयके थांबविण्यात आली. ही देयके हवी असतील तर माझे काम करा, असा फोन त्यांना आल्याचे या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकायला येते.या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत आ.राजू तोडसाम यांच्याशी संपर्क केला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते. संघटना आंदोलनाच्या तयारीतशर्मा यांच्या समर्थनार्थ कंत्राटदार कल्याण संघटना पुढे सरसावली आहे. संघटनेच्या कार्यालयात उपाध्यक्ष संतोष देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी अशी अडचण कधीच आली नाही. आता तर काम करणेच अवघड झाल्याची भावना कंत्राटदारांनी व्यक्त केली. या अन्यायाविरूद्ध कंत्राटदार संघटना बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाCorruptionभ्रष्टाचार