शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुरात नुकसान झालेल्या गणेशमूर्तीकरांना शासनाने मदत करावी; आशिष शेलारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 20:27 IST

मुंबई, रायगडसह अनेक जिल्ह्यात पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत

Maharashtra Monsoon Session, Ashish Shelar: राज्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई विरार, पालघर या जिल्हांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे बरेच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. या भागांमध्ये गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेशमूर्ती बनवल्या जातात. अनेकांची छोट्या प्रमाणावरील उद्योगही आहेत. तर काहींचे कारखाने आहेत. पण मुंबईसह ठाणे, रायगडमधे झालेल्या मुसळधार पावसामुळे गणेशमूर्ती कारखान्यात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने मदत करावी, अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी अधिवेशनात केली. गणेशमूर्तीकरांच्या झालेल्या नुकसानभरपाई बाबत आशिष शेलारांनी औचित्याचा मुद्दा सभागृहात उपस्थितीत केला.

"सरकारने आग्रह धरलेल्या शाडूच्या आणि मातीच्या गणेश मूर्तींचे राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान होत आहे. पेण मध्ये अनेक कारखान्यात पाणी शिरूर मोठे नुकसान झाले आहे. या मूर्तीकारांना सरकारने मदत करावी तसेच पीओपीच्या मूर्तीकारांवर सुरू असणारे धाडसत्र बंद करावे,  एकिकडे पावसाने शाडू मातीच्या मुर्त्या पुराच्या पाण्यात विरघळून गेल्या आहेत. दुसरीकडे सरकार शाडूमातीच्याच मुर्ती असाव्यात याबाबत आग्रह धरते आहे. त्यामुळे याबाबत लवकर भूमिका स्पष्ट करा अन्यथा गणेशोत्सवात मुर्तीच उपलब्ध होणार नाहीत", अशी भिती आशिष शेलारांनी व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Monsoon Sessionमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३Ashish Shelarआशीष शेलारRainपाऊसfloodपूर