शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

NCP ला खातेवाटप करताना मोठा फटका भाजपाच्या मंत्र्यांना बसणार; कोणाची खाती जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 09:05 IST

शिंदे, फडणवीस यांच्याकडील काही खातीही जाणार

मुंबई - राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच खातेवाटप करतील. त्यात आपल्याकडील खात्यांचा त्याग हा भाजपच्या मंत्र्यांना अधिक करावा लागणार आहे. शिवसेनेतील फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील काही खाती राष्ट्रवादीला जातील असे चित्र आहे. शिंदे यांच्याबरोबर जे ४० शिवसेना आमदार गेले. त्यातील ९ मंत्री झाले. त्यांच्यापैकी बहुतेकांकडे एकच खाते आहे. दुसरे खाते असेलही तर ते कमी महत्त्वाचे आहे. भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे मात्र दोन-तीन तुल्यबळ खाती आहेत. विस्तारामध्ये त्यातील काही खात्यांवर नक्कीच टाच येईल.

भाजपच्या ज्या मंत्र्यांकडील एक- दोन खाती जाऊ शकतात त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे १३ तर फडणवीस यांच्याकडे ७ खाती आहेत. शिंदे स्वत:कडे नगरविकास, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क ही खाती कायम ठेवतील. फडणवीस यांच्याकडील वित्त खाते अजित पवार यांना दिले जाईल व गृह खाते फडणवीस यांच्याकडे राहील असे मानले जाते. अजित पवार यांना वित्त खाते मिळाले तरी ते पूर्ण अर्थसंकल्प मांडू शकणार नाहीत. कारण पुढील वर्षी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्यता अधिक आहे.

काय होऊ शकतात बदल?

वैद्यकीय शिक्षण हे महाजन यांचे आवडीचे खाते आहे, मात्र ते त्यांच्याकडून जाऊ शकते. त्यांनी याच खात्यासाठी आग्रह धरला तर महत्त्वाचे ग्रामविकास खाते त्यांच्याकडून जाईल. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे महिला व बालकल्याण, पर्यटन व कौशल्य विकास ही तीन खाती आहेत. त्यातील एक वा दोन जातील. महिला व बालकल्याण त्यांना गमवावे लागेल असे समजते.

रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कायम राहील पण अन्न व नागरी पुरवठा खाते हे राष्ट्रवादीकडे जाईल. तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील पशुसंवर्धन खाते काढले जाऊ शकते. चंद्रकांत पाटील यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज ही तीन खाती आहेत, त्यातील एक वा दोन जातील, असे सूत्रांनी सांगितले. ज्येष्ठता लक्षात घेता मुनगंटीवार यांच्या खात्यांना धक्का लावला जाणार नाही, असेही म्हटले जाते.

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस