शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं...", भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:56 IST

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला.

उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.

नागपुरातील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. यावर बोलताना बावनकुळेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली. "उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत", असे बावनकुळेंनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले.

फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक - ठाकरे उद्धव ठाकरेंनी सोमवारी नागपुरात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना ते म्हणाले की, इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय. काय परिस्थिती आहे. फडणवीस उपमुख्यमंत्री पण त्यांच्यावर काय बोलायचे. त्यांची स्थिती अशी विचित्र झालीय की सहनही होत नाही अन् काय झालेय असे विचारले तर काही नाही काही नाही असे सांगतात. पण झालेय काहीतरी हे नक्की. मी पुन्हा येईन असे बोलले होते. मी एकटा नाही आलोय, दोघांना घेऊन आलोय असे फडणवीस म्हणाले होते. मी त्यांची एक क्लिप दाखवतो असे सांगत 'नाही नाही नाही... एकवेळ लग्न करणार नाही... ही फडणवीसांची क्लिप दाखवली. यानंतर फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहे, असे ठाकरेंनी म्हटले. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस