शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून खडाजंगी; अजित पवार-फडणवीसांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:45 IST

हा आकडा चुकीचा - अजित पवार; कोरोनात उधळपट्टी - देवेंद्र फडणवीस

मुंबई : मंत्र्यांचे बंगले आणि मंत्रालयातील त्यांच्या दालनांवर ९० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. मी माहिती घेतली. खर्चाचा हा आकडा चुकीचा आहे, हे आकडे येतात कुठून, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. बंगल्यांवर नेहमीच कामे सुरू असतात, डागडुजीही होत असते, पण राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना एवढा खर्च करणे उचित नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणे हे सरकार कंत्राटदारधार्जिणे असल्याचे लक्षण आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आरोग्य विभागाच्या तरतुदीतील ५० टक्केही निधी खर्च केलेला नाही. मात्र, बंगल्यांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला, असे दरेकर म्हणाले.सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मंत्र्यांचे बंगले ही त्यांची खासगी मालमत्ता नाही. ते जुने असल्याने दर दोन-तीन वर्षांनी त्यांची डागडुजी करावी लागते. धनंजय मुंडेंचा खुलासामला आठ दिवसांपूर्वीच चित्रकूट बंगल्याचा ताबा मिळाला. मी अद्याप तिथे एक रुपयाचाही खर्च केलेला नाही, असा खुलासा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला. मंत्री (बंगल्याचे नाव)    मंजूर खर्च मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- (वर्षा)    ३.२६ कोटी रु. नवाब मलिक- (मुक्तागिरी)    ८८ लाखअनिल देशमुख- (ज्ञानेश्वरी)    १ कोटी १ लाखसुभाष देसाई- (शिवनेरी)    १ कोटी ४४ लाखनितीन राऊत- (पर्णकुटी)    १ कोटी २२ लाखराजेश टोपे- (जेतवन)    १ कोटी ३० लाखडॉ. राजेंद्र शिंगणे- (सातपुडा)    १ कोटी ३३ लाखएकनाथ शिंदे- (नंदनवन)    २ कोटी ८० लाखबाळासाहेब थोरात- (रॉयलस्टोन)    २ कोटी २६ लाखअजित पवार-(देवगिरी)    १ कोटी ७८ लाखछगन भुजबळ- (रामटेक)    १ कोटी ६७ लाखजयंत पाटील- (सेवासदन)    १ कोटी १९ लाखदिलिप वळसे पाटील- (शिवगिरी)    ९३ लाखअशोक चव्हाण- (मेघदूत)    १ कोटी ४६ लाखदेवेंद्र फडणवीस- (सागर)    १ कोटी ४ लाखनिधी परत...मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चाची चर्चा असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या डागडुजीवर ९२ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर मोठा खर्च केला जात असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी २७ लाखांचा धनादेश परत पाठवून दिला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेAshok Chavanअशोक चव्हाण