शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

फडणवीसांचे दोन शिलेदार सरकारविरोधात अचानक आक्रमक कसे झाले? भूमिकेमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 15:41 IST

धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीबद्दल बोलताना गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आक्रमक शब्दांत टीका केली आहे.

मुंबई - राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी होणारी मागणी आणि या मागणीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून होणाऱ्या विरोधामुळे राजकीय-सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा आरक्षण प्रश्नावरून महाविकास आघाडीतील विविध नेत्यांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झालेली असतानाच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षण आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे दूध दराच्या मागणीवरून सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून होणाऱ्या विविध आरोपांना उत्तर देत त्यांच्यासाठी नेहमीच ढाल ठरणारे हे नेते आता मात्र अचानकपणे महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच वार का करू लागले आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा निर्माण झालेला असतानाच गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. "धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी पुढाकार घेऊन जवळच्या तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण अंमलबजावणीची निवेदने द्या," असं आवाहन पडळकरांनी समाजाला केलं होतं. त्यानंतर राज्यभरात २१ नोव्हेंबर रोजी धनगर समाजाकडून ही मोहीम राबवली गेली. याबाबतचे निवेदन देण्यावरून जालना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा राडाही झाला. सरकारची डोकेदुखी वाढवत धनगर समाजाकडून हिवाळी अधिवेशनादरम्यान ११ डिसेंबरला नागपूर येथे मोर्चाही काढण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदेंवर थेट शाब्दिक हल्ला

धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीबाबत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्रमक शब्दांत टीका केली आहे.  "एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. एका विशिष्ट समाजाचे नाही. धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. ही मुदत संपली आहे. आपण योग्य पावलं उचलावीत, अन्यथा धनगरांच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी," अशा शब्दांत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

सदाभाऊ खोतही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

एकीकडे आरक्षण प्रश्नावरून सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच दूध दराचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "शासनाने काढलेल्या दूध दराबाबतच्या आदेशाची सर्वत्र अंमलबजावणी न झाल्यास दूध आंदोलनाचा भडका उडेल. राज्य शासनाने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या परीपत्रकाची रेठरेधरण ता. वाळवा जि. सांगली येथे शेतकरी बांधवांना सोबत घेऊन होळी करण्यात आली. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडेल," अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसंच या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे भविष्यात ते खरंच सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSadabhau Khotसदाभाउ खोत BJPभाजपा