शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगावी पोहचविणार - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:35 IST

Chandrakant Patil : महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगावी हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबई : मंगळवारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प 2022-23 (Union Budget 2022) सादर केला. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील भाजपाच्या एक लाख 80 हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. दरम्यान, महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगावी हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी या देशव्यापी संवाद उपक्रमात सहभागी झाले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, संजय कुटे, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, जयप्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस (मुख्यालय) अतुल वझे व प्रदेश चिटणीस संदीप लेले उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दात वेगवेगळ्या समाज घटकांना केंद्रीय अर्थसंकल्पाचा कसा लाभ होणार आहे, हे सांगितले. शेतकऱ्यांना दीर्घकाळ उपयोगी पडणारा शेतकरी ड्रोनचा उपक्रम, ग्रामीण महिलांचे पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची साठ हजार कोटींची योजना, ऐंशी लाख घरे असे विविध प्रस्ताव मोदीजींनी नेते समजून दिले. क्रिप्टो करन्सी, डिजिटल बँकिंग असे विषयही मोदीजींनी समजून दिले. तसेच, आता पक्षाचे नेते हा संदेश गावोगावी पोहोचवतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBudgetअर्थसंकल्प 2022Narendra Modiनरेंद्र मोदी