शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

भाजपाची मनसेला साथ; महापालिकेच्या निवडणुकीत देणार एकमेकांना मदतीचा हात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 17:53 IST

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्वाची आहे.

मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सरकारने एखादी चांगली गोष्ट केल्यास या शॅडो कॅबिनेटकडून अभिनंदनही करण्यात येईल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. 

मनसेच्या शॅडो कॅबिनेटचे भाजपाकडून स्वागत करण्यात आले आहे. राज्य सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर मनसेचे शॅडो कॅबिनेट जनतेला पटवून देईल असं भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारला आता 100 दिवस पू्र्ण झाले आहे. त्यामुळे सरकार जनतेच्या हिताचे काम करेल असा विश्वास देखील विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी पक्षाच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. त्यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. मनसेचं हे शॅडो कॅबिनेट सरकारच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी आहे, असं राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत, अशी ताकीदही राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील नेत्यांना दिली आहे.

दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्वाची आहे. यातच मनसेदेखील पहिल्यांदाच नवी मुंबईत महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या दोन उमेदवारांना ५० हजारांच्या अधिक मतदान झालं होतं. युती आणि आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणाऱ्या पक्षांच्या विरोधात मनसेने स्वबळावर घेतलेले मतदान याकडे गांभीर्याने पाहायला हवं. मनसेने मागील काही वर्षात नवी मुंबईत विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपली छाप पाडली आहे. 

महापालिका निवडणुकीत जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्यामुळे भाजपाला एखाद्या मित्रपक्षाची गरज भासणार आहे. तसेच मनसेने हिंदुत्वाची भूमिका स्विकारल्याने  भाजपाकडून मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मनसे आणि भाजपाची विचारसरणी वेगळी आहे. मात्र मनसेने आणखी व्यापक भूमिका घेतली तर भविष्यात युतीबाबत विचार होऊ शकतो असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेBJPभाजपाNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीVinod Tawdeविनोद तावडे