शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Raosaheb Danve : आता हे काय काढतात? आम्हीच यांचे कोथळे काढू; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 12:30 IST

"यांचे लग्न ठरले होते आमच्याशी, हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केले. यांचे सर्व आमदार आणि खासदार एका मुख्यमंत्री पदासाठी नाराज आहेत..."

सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेचे नेते सातत्याने एकमेकांविरोधात टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच, आज भाजप नेते, तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या एका विधानावरून पलटवार करताना, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यांचे लग्न ठरले होते आमच्याशी, हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केले. यांचे सर्व आमदार आणि खासदार एका मुख्यमंत्री पदासाठी नाराज आहेत. आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू, असे दानवे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले दानवे? -दानवे म्हणाले, "यांचं लग्न ठरलं होतं आमच्यासोबत हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लावलं. तुम्हीही मतं दिलीच असतील ना? तुम्ही भाजप-सेनेला मतदान दिलं. ज्याला मतं दिली त्याच्याबरोबर युती तोडून टाकली आणि स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काय? आज यांचे सर्व आमदार आणि खासदार नाराज आहेत एका मुख्यमंत्रीपदासाठी. यामुळे जनता निर्णय करेल. आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्ही कोथळे काढू यांचे."

काय म्हणाले होते संजय राऊत -"लोक म्हणतात, की प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते. पण नाही, प्रेमात नैतिकता पाळायला पाहिजे. पण जेव्हा कुणी युद्ध करायला येत असेल, तेव्हा मी या मताचा आहे, की मी नैतिकता पाळणारा आहे. जर तुम्ही नैतिकता पाळणार नसाल, तुम्ही युद्धाचे नियम पाळणार नसाल, तुम्ही पाठिमागून वार करणार असाल, तर मलाही कोथळा काढण्याचा अधिकार आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ते मुंबई येथे आयोजित शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलच्या मेळाव्यात बोलत होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा