शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 01:15 PM2021-02-12T13:15:35+5:302021-02-12T13:18:43+5:30

भाजप नेते राम कदम (ram kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. आहे. राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

bjp leader ram kadam warns that allow shiv jayanti celebration otherwise else intense agitation | शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देराम कदम यांचा महाविकास आघाडी सरकारला थेट इशाराशिवजयंती साजरी करण्यावरून उद्धव ठाकरे सरकारला पत्रअन्यथा तीव्र आंदोलना करू - राम कदमांचा इशारा

मुंबई : कोरोना संकटामुळे यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे गृहविभागाने नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी दिला आहे. (bjp leader ram kadam warns that allow shiv jayanti celebration otherwise else intense agitation)

भाजप नेते राम कदम (ram kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. आहे. राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ''छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी नाही? शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे, आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का?, अशी विचारणा राम कदम यांनी केली आहे. 

महाराष्ट्रात सातत्याने हिंदूंची गळचेपी

गेल्या काही दिवसात सातत्याने महाराष्ट्रात हिंदूंची गळचेपी होताना दिसते. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला. मात्र, राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांचा अवमान केला. पण, सरकार गप्प बसले. आता तर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या पत्राद्वारे माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राम कदम यांनी सरकारला दिला आहे.

'शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी करा, केवळ 10 व्यक्तींची उपस्थिती असावी'

शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का?

महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केले. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतेय आणि ही शरमेची गोष्ट आहे. शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत, अशी विचारणा राम कदम यांनी आपल्या पत्रातून केली आहे. 

Read in English

Web Title: bjp leader ram kadam warns that allow shiv jayanti celebration otherwise else intense agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.