काँग्रेसनं आपला स्वाभीमान गमावला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, १२ महिन्यांमध्ये सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसनं गुडघे टेकले आहेत, असं म्हणत भाजपा नेते राम कदम यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरावरूनही राजकारण सुरू आहे. "काँग्रेसला सत्तेची इतकी हा आहे की महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्षपदही काँग्रेसचे कार्यकर्ता किंवा राहुल गांधी किंवा सोनिया गांधी या ठरवणार नाहीत. तेदेखील शिवसेना ठरवेल? काँग्रेसच्या स्वाभिमान संपला आहे," असं म्हणत कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
वर्षभरात सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसनं गुडघे टेकले; राम कदम यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 14:57 IST
काँग्रेसनं आपला स्वाभीमान गमावला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, १२ महिन्यांमध्ये सतत अपमानित ...
वर्षभरात सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसनं गुडघे टेकले; राम कदम यांची टीका
ठळक मुद्देकाँग्रेसचा स्वाभिमान संपला असल्याची कदमांची टीका