शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?; कोरोनावरुन प्रवीण दरेकरांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 17:39 IST

pravin darekar react on corona situation: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका दरेकरांनी केलीय.

ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची राज्य सरकारवर टीकाकेंद्राने राज्यात लक्ष घालावे - दरेकरांची मागणीसरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही - दरेकरांची टीका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (pravin darekar react on corona situation in maharashtra state)

राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना पुन्हा लॉकडाऊन करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली. राज्यातील एकूण राजकीय तसेच कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रवीण दरेकर यांनी रोखठोक भाष्य केले. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. 

पाच हजार रुपये जमा करा, मगच टाळेबंदी लावा

सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल, तर आधी सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यावसायिक, कष्टकरी, संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करावे आणि मगच टाळेबंदी जाहीर करावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली. सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचे पाहायला मिळत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका दरेकरांनी केली आहे. 

“व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे”

सरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही

नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी करत नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेडस, व्हेंटीलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिलं होतं. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यानाही कल्पना दिली होती. पण हे सरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही, या शब्दांत दरेकर यांनी हल्लाबोल केला.

प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी; नितीन गडकरींची घोषणा

आता केंद्राने हस्तक्षेप करावा

केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा करत केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत, म्हणून धूळ खात पडून आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दरेकरांनी केली.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाState Governmentराज्य सरकार