शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

बरबटलेल्या हातांनी काय चौकशी करणार; मुबै बँक चौकशी प्रकरणी दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 14:06 IST

Mumbai Bank pravin darekar : मुंबै बँक घोटाळा प्रकरणाच्या चौकशीचे सहकार विभागाचे आदेश. प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केली भूमिका.

ठळक मुद्देमुंबै बँक घोटाळा प्रकरणाच्या चौकशीचे सहकार विभागाचे आदेश. प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केली भूमिका.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईबँक कथित अनियमिततेची चर्चा सुरू आहे. दरम्यान, याची चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाकडून देण्यात आले आहेत. याचा अहवाल येत्या ३ महिन्यांमध्ये सादर करावा लागणार असून यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत टीकाही केली आहे. यावेळी त्यांनी बरबटलेल्या हातांनी चौकशी करणार का? असा संतप्त सवालही केला. 

"मी सरकारवर निरनिराळ्या मुद्द्यांवरून टीका करत असल्यानं मला कोणत्याही चौकशीत अडकवता येतं का त्याचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. कायद्यानुसार टेस्ट ऑडिट झाल्यानंतर कॉम्पलायन्स रिपोर्ट देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी असतो. परंतु सरकारला इतकी घाई झालीये की त्यापूर्वीच त्यांनी चौकशी प्रक्रिया सुरू केली," असं दरेकर यांनी नमूद केलं. 

"बरबटलेल्या हातांनी चौकशी काय करणार? असा सवाल करत त्यांनी राज्य सहकारी बँकेची अर्धवट चौकशी पुन्हा सुरू करा," असं म्हटलं. "मी एक पत्र देणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाघोटाळा आहे. १५-२० कोटी रूपयांचं सॉफ्टवेअर १५० कोटी रूपयांना घेतलं आहे. राज्यातल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील अन्य जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांची आम्ही रितसर तक्रार करणार आहोत, महाराष्ट्रातील घोटाळ्यांच्या महामेरूंना उघडं करणार. प्रविण दरेकरांचा एककलमी कार्यक्रम आता सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हा आहे," असंही त्यांनी सांगितलं.सर्व आरोपांची उत्तरं देणारसर्व आरोपांची उत्तरं जिल्हा बँक देणार आहे. यापूर्वीही उत्तरं दिली आहे. अशाप्रकारे सूडानं वागलं तरी आवाज दाबता येणार नाही. अशा चौकशांना आपण भीक घालणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वांना सोबत घेऊन काम केलं असून १० वर्ष बँकेला अ वर्ग मिळाला असल्याचंही दरेकरांनी नमूद केलं.

टॅग्स :Mumbaiमुंबईpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाbankबँकNCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकार