शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही फक्त कोरोनावर लक्ष केंद्रीत करा; बुलेट ट्रेन नागपूरलाही नेऊ; भाजपाकडून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 17:31 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बुलेट ट्रेनवरील विधानाला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर

पिंपरी: प्रत्येकाला जगण्याची चिंता आहे. लोकांच्या जिवीताचे रक्षण करण्याला सरकारने प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी कोविडवर फोकस करावा. बुलेट ट्रेन नागपुरलाही नेऊ, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.खेड तालुक्यातील चाकण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्या पीडित कुटुंबाची दरेकर यांनी रविवारी (दि. २६) भेट घेतली. दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी पीडित कुटुंबाने त्यांच्याकडे केली. त्यानंतर दरेकर यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेतली. देशात कायद्याचे राज्य आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी पोलिसांना केली. आमदार महेश लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके आदी या वेळी उपस्थित होते. राज्यातील सत्ता तीन चाकांवर असली तरी त्याचे स्टेअरिंग माझ्याच हाती आहे, इतर दोन पक्ष मागे बसले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाखती दरम्यान म्हणाले. त्यावर दरेकर म्हणाले, सरकारची गाडी किती चाकी आहे, पुढे व मागे कोण बसलंय, गाडी खड्ड्यात आहे की बाजूला जातेय यापेक्षा कोविडचा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन सर्वांना बरोबर घेऊन कोविडच्या संकटाला सामोरे गेले पाहिजे. जातीने लक्ष देऊन उपाययोजना केली पाहिजे. वेळेत नियोजन झाले नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.नागपूरला बुलेट ट्रेनने जोडले असते, तर मला अधिक आनंद झाला असता, असे मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या मुलाखती दरम्यान म्हणाले. याबाबत दरेकर म्हणाले, आपल्या जिवीताचे रक्षण करणे, याच गोष्टीला आजच्या घडीला प्राधान्य आहे. जगलो तर सर्वकाही करता येईल. त्यामुळे जगण्यासाठी आधी कोविडवर लक्ष केंद्रीय करायला हवे. बुलेट ट्रेन आणायला वेळ आहे. ती आपण नागपूरलाही नेऊ. नागपूर महामार्ग होतोच आहे. त्यामुळे राजकीय टिकाटिप्पणी करण्याची ही वेळ नाही, याचे सरकार म्हणून भान ठेवले पाहिजे.’’

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाBullet Trainबुलेट ट्रेन