शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “संजय राऊत १०० टक्के वैफल्यग्रस्त झालेत, आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 16:10 IST

Maharashtra News: हमरीतुमरीवर येणे म्हणजे संजय राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचे दिसत आहे; भाजप नेत्याची टीका

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकार कोसळणार असल्याचे दावा केला आहे. चित्र हळू हळू बदलतेय. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. २०२४ ची तयारी सुरू आहे. पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे माझे मत पक्के आहे, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया येत असून, भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत १०० टक्के वैफल्यग्रस्त झाल्याची टीका दरेकरांनी केली आहे. 

संजय राऊत यांचा पहिल्यांदा इतका तोल ढासळलेला दिसत आहे. १०० टक्के वैफल्यग्रस्त झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. हमरीतुमरीवर येणे म्हणजे संजय राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचे दिसत आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचा कारभार आधीच आदित्य ठाकरेंकडे गेला आहे. संजय राऊतांच्या हातात काहीच राहिलेले नाही, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. 

आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत

महाविकास आघाडीचे सरकार असतानाच शिवसेनेचा कारभार आदित्य ठाकरेंकडे गेला होता. संजय राऊत यांच्या हातात आता काहीही राहिलेले नाही. नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. मात्र, तेच बैठकांवेळी बाहेर असायचे. विभागाचा कारभार आदित्य ठाकरे चालवायचे, असे सांगत आता ठाकरे गटाकडे अशी किती शिवसेना शिल्लक आहे. तळागाळात, ग्राऊंडवर जाऊन काम करणारे किती जण शिवसेनेत आहेत, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच आमच्याकडे, ओसाड गावचा पाटील करणे, असे म्हटले जाते. तसेच संजय राऊत हे आदित्य ठाकरे यांना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत, असा खोचक टोला प्रवीण दरेकरांनी लगावला. 

दरम्यान,  छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. गिरे तो भी टांग उपर!, असे अजित पवारांचे झाले आहे. विधान चुकल्यानंतर, विरोध झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती.पण अजित पवार यांचा अहंकार असा आहे की आम्ही सगळ्यांच्यावर आहोत! तो अहंकार त्यांच्यातून जायला तयार नाही, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेतला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरSanjay Rautसंजय राऊतAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना