शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

By बाळकृष्ण परब | Updated: November 16, 2020 09:33 IST

Beed acid attack incident : बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?

ठळक मुद्देबीड तालुक्यातील येळंबघाट परिसरात शनिवारी दुपारी एक २० वर्षीय तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होतीही २० वर्षीय तरुणी विवाहित होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती पुणे येथे प्रियकरासोबत राहत होती१४ रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नेकनूर-केज रोडलगत आरोपी तरुणाने दुचाकी थांबवली आणि त्याठिकाणी तिच्यावर अ‍ॅसीड हल्ला केला

मुंबई - बीडमध्ये एका तरुणीवर सुरुवातीला अ‍ॅसिड हल्ला करून नंतर तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान, या धक्कादायक प्रकारावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.निलेश राणे यांनी ट्विट करत सरकारने टीका केली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की, बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? राज्यात महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

एका २० वर्षीय विवाहित तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट (ता.बीड) येथे घडली होती. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरून काल सकाळी बीड जिल्हा रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. माणूसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.बीड तालुक्यातील येळंबघाट परिसरात शनिवारी दुपारी एक २० वर्षीय तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील २० वर्षीय तरुणी विवाहित होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती पुणे येथे प्रियकरासोबत राहत होती. १३ नोव्हेंबर रोजी दोघेही पुण्याहून दुचाकीवरून गावी निघाले होते. १४ रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नेकनूर-केज रोडलगत आरोपी तरुणाने दुचाकी थांबवली आणि तिला रस्त्याच्या बाजूला नेले. त्याठिकाणी तिच्यावर अ‍ॅसीड हल्ला केला. त्यानंतर पेट्रोल टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. तरुणीला अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून तो फरार झाला.पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ती तरुणी जाग्यावरच तडफडत होती. रोडवरून जाणाऱ्या वाहनधारकांना तिचा आवाज आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जावून पाहिले असता पीडित तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. याची माहिती नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने तिला नेकनूर येथील कुटीर रूग्णालयातून पुन्हा रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनिवारी रात्रभर तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र 48 टक्के भाजल्याने तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून, आज सकाळी जिल्हा रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. 

 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCrime Newsगुन्हेगारी