शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

"एवढी बडबड करता ना, मग जाऊ द्या ना त्यांना ईडीसमोर"; नारायण राणेंचा राऊतांवर निशाणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 28, 2020 18:35 IST

भाजप नेते नारायण राणे, यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीचे समर्थन केले आहे.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर आता भाजप नेते नारायण राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते नारायण राणे, यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीचे समर्थन केले आहे. टीव्ही-9 सोबत बोलताना राणे म्हणाले, “संजय राऊत एवढी बडबड करता ना, मग जाऊदे ना त्यांना ईडीच्या समोर. पुरावे असल्याशिवाय ईडी आणि सीबीआय चौकशी करत नाही. पुरावा लागतो. तेव्हाच ते नोटीस पाठवतात आणि तपास करता,” अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला. एवढेच नाही, तर भाजप ईडीचा वापर करत नाही. केंद्र सरकारअंतर्गत ईडी आणि सीबीआय आहे, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.

काय म्हणाले होते राऊत - राऊत म्हणाले, गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि काही हस्तक मला सातत्याने भेटायचा प्रयत्न करत आहेत. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची पूर्ण तयारी केली आहे, असे सांगत ते मला धमकावत आहेत. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, अशी धमकीही मला दिली जात आहे. पण मीही त्यांचा बाप आहे, असेही राऊत म्हणाले होते.

हस्तक सरकार पाडण्यात अपयशी ठरले, कारण... -भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. त्यांच्यावर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगितले आहे. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकून आहे. आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. आमची तयारी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे, असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला होता. मात्र, हे हस्तक सरकार पाडण्यात अपयशी ठरले, कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. यामुळेच सरकारच्या खंद्या समर्थकांना आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा दावाही राऊतांनी यावेळी केला होता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेना