शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची बोचरी टीका

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 16:36 IST

नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण राणे बोलत होते.

ठळक मुद्देनारायण राणे यांची शिवसेनेवर जोरदार टीकाविकासकामांना विरोध करणारी शिवसेना उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांत पुढे - नारायण राणेडेअरिंगबाज माणसाकडून उद्घाटन करण्याची सर्वांची मागणी - नारायण राणे

सिंधुदुर्ग : शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची बोचरी टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. (BJP Leader Narayan Rane criticize Shiv Sena in Sindhudurg)

लाइफटाइम रुग्णालय आणि महाविद्यालय याचे भूमिपूजन केले तेव्हापासून खूप विरोध करण्यात आला. शिवसेनेकडून याला सर्वाधिक विरोध करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी नवीन रुग्णालय उभारणार असून, या रुग्णालयासाठी ९०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. तिजोरीत एक पैसा नसताना ९०० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी बोलताना केला. 

विकासकामांना शिवसेनेचा विरोध

कोकणात विमानतळ होणार होते. तेव्हाही शिवसेनेने विरोध केला होता. यावेळी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकासकामांनाही शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला. मात्र, एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली. 

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

डेअरिंगबाज माणसाकडून उद्घाटन

कितीही विरोध आणि वाद झाला तरी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. आमच्या काही डॉक्टरांना विचारले की, उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे धाडस केले. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा, अशी मागणी सर्वांनी केली. त्यामुळे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्घाटन कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. अमित शहा यांनीही तत्काळ होकार दिला, असे नारायण राणे यांनी सांगितले.

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती

बाळासाहेबांच्या सर्व वचनांना काशीत बुडवून शिवसेनेने सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाAmit Shahअमित शहाkonkanकोकण