शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

"संजय राऊतांना सत्तेचा माज, त्यांनी अपक्षां आमदारांचा अपमान केला", अनिल बोंडेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 13:26 IST

Anil Bond slams Sanjay Raut: नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी घोडेबाजार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई- नुकतीच राज्यसभा निवडणूक पार पडली. यात महाराष्ट्रातील सहापैकी तीन जागांवर भाजपचा विजय झाला, तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली. दरम्यान, शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात झालेल्या थेट सामन्यात भाजपचा विजय झाला. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही अपक्ष आमदारांची नावे सांगत भाजपला मतदान केल्याचा आरोप केला. यावर भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bond) यांनी जोरदार टीका केली.

'संजय राऊतांना सत्तेचा माज'राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनिल बोंडे नागपूरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना बोंडे म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनता आता महाविकास आघाडीला वैतागली आहे. महाविकास आघाडीतील आणि अपक्ष आमदारही त्यांना वैतागले आहेत. संजय राऊत यांना तर सत्तेचा माज आलाय, ते द्वेषाने पेटलेले आहेत, म्हणूनच त्यांनी अपक्ष आमदारांचा अपमान केला. अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा त्यांनी केला," अशी बोचरी टीका बोंडे यांनी केली आहे. 

'देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत...'ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीतल्या आमदारांकडून त्यांचे मंत्री कमिशन घेतात तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? पक्षातील आमदारांनाच त्यांचे मंत्री, मुख्यमंत्री भेटत नाहीत. महाराष्ट्रातील जनता सरकाला वैतागली आहे. यांच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत आहे. सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळाचीच आठवण येत आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असंही बोंडे म्हणाले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAnil Bondeअनिल बोंडेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना