शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हे खासदार आहेत ते माझंच पाप, नारायण राणेंचा संजय राऊतांवर टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 10:22 IST

पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी काय केलं? राणेंचा सवाल

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून काय केलं? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गेलात? शिवसेना कुठे घेऊन गेलात? कोणत्या शाखेचं उद्घाटन केलं? महाराष्ट्रातील कोणत्या सैनिकाचं दु:ख पुसलं, कोणाला घर दिलं नोकरी दिली? उपासमारीच्या वेळी अन्न दिलं. उद्धव ठाकरेंनी एक तरी उदाहरण द्यावं,” असं म्हणत नारायण राणे यांनी टीकेचा बाण सोडला. 

“संपादक म्हणून चांगलं लिहा. हे खासदार आहेत ते माझं पाप आहे. बाळासाहेंबांनी त्यावेळी मला बोलावलं होतं. मी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यावेळी ते तिकडे बसले होते. संजय राऊतांना खासदार बनवायचंय, उद्या फॉर्म भरायचाय, त्याला घेऊन जा आणि खासदार कर असं बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं. त्यांच्यासमोर मी कधी नाही म्हटलं नाही. दुसऱ्या दिवशी मी विधानभवनात कागदपत्रं घेऊन बोलावलं होतं,” असा दावाही राणेंनी केला. 

“बोलायला लावू नका”“शिवसेनेची काय अवस्था झालीये. ४० आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेंसोबत जातात आणि शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी पाहतात. उद्धव ठाकरे रडले की हे रडतात. रडणारी शिवसेना कधीच नव्हती, लढणारी शिवसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही सांगायचो. आता कुठे आहे सळसळतं रक्त,” असं म्हणत नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

“हे दुसऱ्यांना खोके म्हणतात. तुम्ही नाही का घेतले खोके? आम्ही काय मातोश्रीवर गुच्छ घेऊन जायचो का मातोश्रीवर? उद्धव ठाकरे सांगतील त्या दिवशी आम्ही काय काय आणि कोणत्या कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे सांगेन. आम्हाला बोलायला लावू नका, वयाच्या १५ व्या वर्षापासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांसाठी आम्ही वेडे होतो. त्यांनी प्रेमही दिलं आणि विश्वासही दिला. त्यामुळे आम्ही त्यागाला तयार होतो. जीवाची पर्वा केली नाही. संपादकाचाही पगार घ्यायचा आणि नेता म्हणूनही तोडबाजी करायची असं नाही,” असं म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे