शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Anil Parab : “अनिल परब म्हणजे नटवरलाल, त्यांची उलटी गिनती..,” सोमय्यांचा जोरदार निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 07:32 IST

दापोली येथील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांची १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने बुधवारी जप्त केली.

दापोली येथील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांची १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दापोली येथील मुरूडमधील ४२ गुंठे जमीन (किंमत २ कोटी ७३ लाख) आणि साई रिसॉर्ट (किंमत ७ कोटी ४६ लाख) ) आदींचा समावेश आहे. दरम्यान, यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परब म्हणजे नटवरलाल असल्याचं म्हणत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

अनिल परब यांची उलटी गिनती सुरू झाली. अनिल परब म्हणजे नटवरलाल, तो मी नव्हेच. अनिल परब यांना ॲटॅच करायलाही अधिक वेळ लागणार नाहीये. ४ एफआयआर त्यांच्यावर केलेत. येत्या काळात त्यांच्यावर आणखी २ एफआयआर होणार. ईडीची कारवाई त्यांच्यावर सुरू झाली आहे. २५ कोटींच्या रिसॉर्टसाठी पैसे आले कुठून. हिशोब तर घेणारच,” असं किरीट सोमय्या म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान, त्यांनी परब यांच्यावर टीकेचा बाण सोडला.

रिसॉर्टशी आपला काही संबंध नाही असं अनिल परब म्हणाले होते. यावरही सोमय्या यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी महाराष्ट्र सरकारला ॲक्टिंगसाठी महान कलाकार असा देण्यात येणारा पुरस्कार अनिल परब यांना द्यावा अशी मी सरकारला विनंती करणार आहे. तो मी नव्हेच असं म्हणून परब जेल मध्ये जाण्यापासून सुटका नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

ईडीचेम्हणणे....• महसूल खात्याकडून अवैधरीत्या परवानगी घेत तेथील भूखंडावर तळ मजला एक असे दोन बंगले परब यांनी बांधले.• या प्रकरणात आपले नाव येऊ नये याकरिता कागदोपत्री मूळ मालकाचे नाव परब यांनी कायम ठेवले होते आणि बांधकामासाठी अर्ज करताना मूळ मालकाची बनावट स्वाक्षरी केली होती.• ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतेवेळी ही जागा सीआरझेड-३ मध्ये येत असल्याची बाब लपविली.• याप्रकरणी आर्थिक व्यवहार रोखीने करण्यात आले होते. प्रकरण उजेडात आल्यानंतर परब यांनी केवळ कागदोपत्री ही जमीन सदानंद कदम यांच्या नावे केली होती.

कायम्हणाले अनिलपरब?"या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. जी संपत्ती जप्त केलेली आहे त्याचे मालक सदानंद कदम आहेत. ईडीने या गोष्टी तपासलेल्या आहेत. त्यांची कारवाई चूक की बरोबर हे न्यायालय ठरवेल. मी न्यायालयात जाऊन न्याय मागेन. मला राजकीयदृष्ट्या बदनाम केले जात आहे."

टॅग्स :Anil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय