शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

Coronavirus : "पटोलेजी... प्रियंका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 15:08 IST

प्रियंका गांधींच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल हे पाहावं, भाजपनं दिला सल्ला. 

ठळक मुद्देप्रियंका गांधींच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल हे पाहावं, भाजपनं दिला सल्ला. प्रियंका गांधी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रावर साधला होता निशाणा

"कोरोनाची महाराष्ट्रातील स्थिती अतिशय भयानक होत आहे. महाविकास आघाडी सरकार पुरते अपयशी ठरले आहे. स्वतः काहीच करायचे नाही आणि काहीही झाले की केंद्राच्या नावाने खडे फोडायचे, हा एकमेव उद्योग केला जात आहे. अशात  प्रियंका गांधी एक मोठी मुलाखत दिलेली आहे. काय केले पाहिजे, याचे त्यांचे ज्ञान पाहता हवे तर त्यांची मदत घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा," असा सल्ला भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना नाना पटोले यांना दिला आहे. 

"केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन दिला, सर्वाधिक रेमडेसिवीरचा कोटा महाराष्ट्राला दिला. हा कोटा किती रुग्ण कोणत्या राज्यात ऑक्सिजनवर आहेत, हे पाहून दिलेला आहे. सुरुवातीपासून सर्वाधिक मदत मिळत असताना केवळ बोंबा करण्याचे काम वगळता महाविकास आघाडी सरकारने काहीही केलेले नाही. सर्वाधिक मदत मिळूनही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात अशीच स्थिती आहे. त्यामुळे हवे तर डॉ. मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या सर्व सूचना राज्यात अंमलात आणा, प्रियंका गांधी यांना काही दिवस राज्यात बोलवा, पण महाराष्ट्रातील स्थिती आता आटोक्यात आणली पाहिजे," असं उपाध्ये म्हणाले.

"बाकी विरोधी पक्ष म्हणून आणि केंद्रातील सरकारसुद्धा सुरूवातीपासून राजकारण न करता महाराष्ट्रासोबत आहे आणि यापुढे पण राहील. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची चिंता तर अजिबात करू नका. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत अनेक बाबतीत राज्याला मदतच केली आहे आणि यापुढेही करतील. आपण प्रियंका गांधी यांच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल, तेवढे फक्त पहा," असा सल्ला सुद्धा केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांना दिला आहे.काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी?

"रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली," असे प्रियंका गांधी म्हणाल्या. "लसीकरणात तुम्ही देशवासीयांना प्राधान्य का दिलं नाही? तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. कोरोनाची लस मॉरिशिअस, नेपाळला जात असल्याचे आम्ही पाहात होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लसी दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच तुटवडा जाणवत आहे," अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीNana Patoleनाना पटोलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस