शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनाची दिशा बदलणार?; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 17:52 IST

थोड्याच वेळात राज ठाकरे महाअधिवेशनाला संबोधित करणार

मुंबई: मनसेनं त्यांच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात नव्या झेंड्याचं अनावरण केलं. यानंतर आता भाजपानंमनसेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र पक्षाची भूमिका राज ठाकरेच जाहीर करतील, हे मनसे नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात होणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मनसेची आगामी भूमिका काय असणार, पक्ष भाजपासोबत जाणार का, या प्रश्नांची उत्तरं राज यांच्या भाषणातून मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मनसेकडून आज सकाळी नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. याआधी मनसेच्या झेंड्यात तीन रंग होते. मात्र आता मनसेच्या झेंड्यात केवळ भगवा रंग आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराजाचं प्रतीक असलेली राजमुद्रादेखील झेंड्यावर आहे. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेनं विचारधारा बदलल्यास एकत्र येऊ, असे संकेत भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुनगंटीवार यांनी मनसेबद्दल भाष्य करताना महाविकास आघाडी सरकारचा संदर्भ दिला. ते सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. तर मग आम्ही सत्यासाठी सोबत का येऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेच्या नव्या भूमिकेचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी भाजपा-मनसे युतीचे संकेतदेखील दिले. मात्र यावर मनसेनं सावध भूमिका घेतली. राज ठाकरे थोड्याच वेळात मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. यावेळी ते पक्षाची भूमिका मांडतील, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन होत असून थोड्याच वेळात राज ठाकरे या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMNSमनसेBJPभाजपा