शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"आज मला 'त्या'चा पश्चाताप, 'ते' नसते केले तर बरे झाले असते"; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 08:51 IST

फडणवीस म्हणाले की, ते एक पुस्तक लिहीत आहेत, ते त्यात सर्व घटनांचा उहापोह करणार आहेत. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सध्या "केवळ सरकार आहे, शासन नाही," असेही ते म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे. "मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते. आपण लढलो असतो." एवढेच नाही, तर  "आता बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली, काय काय केली. हे मात्र, माझ्या पुस्तकात कळेल. त्याची वाट बघा...," असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले फडणवीस? - 'मुंबई तक' या यूट्यूब चॅनलवर बोलताना फडणवीस म्हणाले, "अजित पवारांसोबत आम्ही जे सरकार तयार केले होते, ते एका वेगळ्या भावनेतून तयार केले होते. कारण आमच्यासोबत विश्वास घात झाला होता आणि दोन्हीकडून झाला होता. त्या विश्वास घातानंतर आम्हाला वाटले, की आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय. तर राजकारणात जिवंत रहायला पाहिजे, जशास तसे उत्तर दिले पाहिजे. म्हणून ते केले. 

बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली? माझ्या पुस्तकात कळेलच -आज तुम्ही मला विचाराल तर, मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते. आपण लढलो असतो. पण त्यावेळी असे वाटत होते की, काय असते ना, एक खुन्नस असते, आपल्याला एवढा धोका दिला? एवढी आपल्यासोबत बेइमानी झाली? चला दाखवून देऊ. त्या भावनेतून ते केले. ठीक आहे आता तो विषय संपला. आता बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली, काय काय केली. हे मात्र, माझ्या पुस्तकात कळेल. त्याची वाट बघा..."

सध्या राज्यात केवळ सरकार, शासन नाही -फडणवीस म्हणाले की, ते एक पुस्तक लिहीत आहेत, ते त्यात सर्व घटनांचा उहापोह करणार आहेत. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सध्या "केवळ सरकार आहे, शासन नाही," असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने 10000 कोविड मृत्यू लपवले -यावेळी फडणवीस यांनी, महाराष्ट्रात कोरोनाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल, उद्धव सरकारेंवर जोरदार हल्ला चढवला. "राज्य सरकारने 10000 कोरोना मृत्यू लपवले. कोरोनाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळल्याबद्दल सरकार स्वतःची पाठ थोपटून घेते. पण देशातील एकूण कोविड मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातच झाले आहेत, हे वास्तव ते का स्वीकारत नाहीत?" असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे