शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 16:59 IST

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, तसेच मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा मागण्या जरांगे पाटलांकडून केल्या जात आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं जाऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.   "आम्ही ओबीसी नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेली अधिसूचना ही कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातील नाही, हे आम्ही छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांना समजावून सांगणार आहोत," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसंच "मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरही सरकारकडून कार्यवाही केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून वेगाने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही आपलं उपोषण स्थगित करायला हवं," अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.  

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काय घोषणा केली आहे?

ओबीसी नेते आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनीही मी अंतरवाली सराटी इथंच ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे."ओबीसींचं सामाजिक न्यायाचं आरक्षण वाचवण्यासाठी मी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी इथंच मी उपोषण करणार असून याबाबत माझी अंतरावाली गावातील आणि आसपासच्या भागातील नागरिकांशी चर्चा झाली आहे," अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. ज्या गावात मनोज जरांगे उपोषण करत आहेत, त्याच गावात हाके यांनीही उपोषणाची भूमिका घेतल्यास दोन समाजात संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागणार आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षण