शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पवार साहेब मोठे नेते, त्यांच्या मनात 'ती' वेदना असेल; वर्मावर बोट ठेवत फडणवीसांचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 10:47 IST

फडणवीसांना पवारांना टोला, मुख्यमंत्र्यांना चिमटा, महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

मुंबई: मी चारवेळा मुख्यमंत्री झालो. पण मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर मला कधीच मी अजूनही मुख्यमंत्री आहे असं वाटलं नाही. देवेंद्र फडणवीसांना अजूनही तसं वाटत असेल तर चांगलंच आहे. मी पुन्हा येईनची वेदना किती खोल आहे, हे त्यातून दिसतं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल फडणवीसांना लगावला. त्यानंतर आता फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे.

शरद पवार साहेब खूप मोठे नेते आहेत. मोठ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं द्यायची नसतात. पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण त्यांना कधीच पंतप्रधानपद मिळालं नाही याची वेदना त्यांच्या मनात असेल, असंही आपण म्हणू शकतो, अशा शब्दांत फडणवीसांनी पवारांना चिमटा काढला. राज्यात आम्हाला सत्ता मिळाली नाही ही गोष्ट खरी आहे. पण त्यामुळे आम्ही हातपाय गाळले नाहीत. विरोधी पक्ष म्हणून आमची कामगिरी उत्तम आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला आहे. पूर, वादळात आम्ही राज्यभर फिरलो. कोविड काळात लोकांची सेवा केली. घरात बसून राहिलो नाही, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सणसणीत टोला लगावला.

राज्यातील सध्याची परिस्थिती वाईट आहे. ज्या वेगानं भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत आहेत, तसं याआधी कधीच घडलेलं नाही. हजारो कोटी रुपयांची दलाली सुरू आहे. त्या दलालीचे पुरावे सापडत आहेत. प्रत्येक पक्षात मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत. त्यानुसारच त्यांचं कामकाज सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नाहीत. लखीमपूरमधील शेतकऱ्यांबद्दल सरकारला कळवळा वाटतो. पण राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय, अशी टीका फडणवीसांनी केली.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या अतिशय आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. सोमय्या पुराव्यांसोबत बोलतात. त्याशिवाय ते आरोप करत नाहीत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता १०० टक्के आहे. आरोप असलेल्या मंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत, असं फडणवीस म्हणाले. सोमय्यांनी काही वर्षांपूर्वी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, तेच नेते आज भाजपमध्ये आहेत, त्याचं काय?, असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर विरोधकांनी याबद्दल पाठपुरावा करावा. त्यांच्या अंगावर शेकलंय म्हणून उगाच दुसऱ्यांचे विषय काढू नयेत, असा सल्ला फडणवीसांनी दिला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे