शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"मुख्यमंत्र्यांचं मौन चिंताजनक; ते बोलत नसतील, तर राज्यपालांनी बोलत करावं!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 14:15 IST

आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यानंतर फडणवीस म्हणाले, महाविकासआघाडीने संपूर्ण नैतिकता पायदळी तुडवली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या घटना समोर येत आहेत. त्या अत्यंत चिंताजनक आहेत आणि त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मौन तर अधिकच चिंताजनक आहे. मात्र, या घटनांवर ते बोलत नसतील, तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला. (BJP leader Devendra Fadnavis comment on thackeray government after governor Bhagat Singh koshyari meet)

आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यानंतर फडणवीस म्हणाले, महाविकासआघाडीने संपूर्ण नैतिकता पायदळी तुडवली आहे. केवळ सत्तेसाठीच हे सर्व सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर हल्ला चढवताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. त्यात त्यांनी केवळ गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम केले. तर काँग्रेस अस्तित्वहीन आहे. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि राज्यात काही वेगळेच बोलतात. त्यांची काहीही भूमिका नाही. तसेच, आम्ही राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

सरकार वाचविण्यासाठी हे सर्व सरू -मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत. या विषयांवर त्यांनी बोलायला हवे. मात्र, त्यांना माहीत आहे, की या मुद्द्यांवर बोलणे अवघड आहे. यावर बोलले तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. 

लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब हे लवकरच समजेल -फडणवीस म्हणाले, दिल्लीत काल जाऊन जो अहवाल दिला, तो लवंगी फटका होता की, मोठा बॉम्ब होता, हे लवकरच समोर येईल. तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? 25 ऑगस्ट 2020 पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमके कोण यात लिप्त आहेत, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. 

"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

संजय राऊत मोठे नेते नाहीत -फडणवीस म्हणाले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाहीत. ते काही सरकारी व्यक्ती नाहीत. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालात सरकारबद्दल काहीही चुकीचे नाही. आपण तो अहवाल वाचावा. या कागदाची काय दखल घ्यायची ते मुख्यमंत्री ठरवतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे काही कागदपत्रे दिली त्यात काडीचाही दम नाही. विरोधी पक्षनेते म्हणे काही बॉम्ब वगैरे घेऊन आले होते. पण, तो बॉम्ब नसून भिजलेला लवंगी फटका आहे. या फटाक्याला वातसुद्ध नव्हती, आम्हीच दिल्लीत कुठे स्फोट झाला का, हे शोधत होतो, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालाची खिल्ली उडवली होती.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार