शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 18:41 IST

"देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिट मटेरियल आहेत; तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे मात्र वकुब नसलेले टमरेल आहात. त्यामुळे... "

राज्यात लोकसभा निवडमुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच विविध पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. दरम्यान, आरोप-प्रत्यारोप करताना नेतेमंडळींचा तोल जातानाही दिसत आहे. यातच, शिवसेना नेते (ठाकरे गट) संजय राऊत यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना, "ते (देवेंद्र फडणवीस) राजकारणातलं अत्यंत कच्चं मडकं आहेत. कॉपी करून पास झालेली पोरं असतातना, त्यांना डॉक्टरकी करता येत नाही. मग पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत," असे वक्तव्य केले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर "ओऽऽऽ टीनटप्पर सर्वज्ञानी…" म्हणत  निशाणा साधला आहे. 

वाघ यांनी सोशल मीडिया प्लॅट फॉर्म एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे, "ओऽऽऽ टीनटप्पर सर्वज्ञानी… देवेंद्र फडणवीस काय आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिट मटेरियल आहेत; तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे मात्र वकुब नसलेले टमरेल आहात. त्यामुळे ४ जूनला तुम्ही जनतेकडून सणसणीतपणे लाथाडले जाणार आहात. कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठे तुम्हा नकलींचा कमअस्सल खोटा शिक्का…? देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही. जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे ते निष्णात डॅाक्टर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे सल्ले उद्धव ठाकरेंना द्या." 

एवढेच नाही तर, "आमच्या नेत्यांना खालच्या पातळीवर बोलाल,  तर त्याच पातळीवर तुम्हाला उत्तरं मिळतील लक्षात ठेवा," असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. तसेच ही पोस्ट त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाही टॅग केली आहे.

काय म्हणाले होते राऊत - उद्धव ठाकरे यांना १९९९ पासून मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, असा प्रश्न विचारला असता, यावर बोलताना राऊत म्हणाले होते, “आम्हाला स्वप्न पडत नाहीत. आम्ही स्वप्नात कधी जगत नाही. आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहीत आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहेत. तुम्हाला जो काही स्वप्नातला अजार झाला होता, तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झाली आहे.”

यावर, नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले, असे फडणवीस म्हणाले, असे विचारले असता, उत्तर देताना राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हरले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपा युती निवडणूक हारले. हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नाही. ते राजकारणातलं अत्यंत कच्चं मडकं आहेत. कॉपी करून पास झालेली पोरं असतातना, त्यांना डॉक्टरकी करता येत नाही. मग पेशंट मरतात टेबलावरच. त्या प्रकारचे फडणवीस आहेत."

तसेच, "नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हारलो. हे फडवीसांना माहीत नसेल,”, असेही राऊत यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा