शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

खडसेंवर अन्याय झाला का?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली गाय-बकरीची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 20:18 IST

एकनाथ खडसेंच्या आरोपांना चंद्रकांत पाटलांकडून प्रत्युत्तर

मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या एकनाथ खडसेंनीभाजपावर गंभीर आरोप केले. बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी मिळते. मात्र पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेल्याचं खडसे म्हणाले. खडसेंनी केलेल्या गंभीर आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.खडसे वारंवार पक्षावर जाहीरपणे आरोप करत असल्यानं यावर भाष्य करणं गरजेचं असल्याचं पाटील म्हणाले. यावर भाष्य करताना पाटील यांनी गाय-बकरीची गोष्ट सांगितली. 'एक माणूस बाजारात गाय घेऊन जात असतो. त्यावेळी त्याला वाटेत एक जण भेटतो. तो त्याला बकरी घेऊन कुठे निघालास, असं विचारतो. ती बकरी नसून गाय असल्याचं तो माणूस सांगतो. पुढे रस्त्यात भेटलेले अनेकजण बकरी कुठे घेऊन चाललास, अशी विचारणा करतात आणि बाजारात जाईपर्यंत त्या माणसाला आपल्यासोबत खरंच बकरी आहे, असं वाटू लागतं,' अशी गोष्ट पाटील यांनी सांगितली. एकच गोष्ट वारंवार सांगितली की ती खरी वाटू लागते. त्यामुळेच या विषयावर भाष्य करत असल्याचं पाटील म्हणाले.

विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर खडसेंनी भाजपावर शरसंधान साधलं. निष्ठावंतांना तिकीटं नाकारली जातात आणि बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देण्यात येते, असा आरोप खडसेंनी केला. त्यावर खडसेंना आतापर्यंत खूप काही दिलं, असा विचार करून केंद्रीय नेतृत्त्वानं त्यांना तिकीट नाकारलं असावं, असं पाटील यांनी म्हटलं. आयुष्यभर खस्ता खाऊन इतरांना मोठं करण्याची आमची संस्कृती असल्याचं पाटील यांनी सांगितलं. वसंतराव भागवत यांना पक्षाकडून काहीच मिळालं नाही. मुंडे, महाजन त्यांना गुरू मानायचे. भागवत यांनी नेते घडवले, असं पाटील यांनी सांगितलं.

एकनाथ खडसेंवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबाला मिळालेल्या सगळ्या पदांची यादीच वाचून दाखवली. 'खडसे सातवेळा आमदार झाले. दोनवेळा त्यांना मंत्रिपद मिळालं. त्यांच्या सुनेला दोनदा खासदारकी मिळाली. मुलीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. खडसे यांच्या पत्नीला महानंदाचं अध्यक्षपद देण्यात आलं,' असं पाटील यांनी सांगितलं. 

पाठीत खंजीर खुपसल्याची भावना खडसेंनी व्यक्त केली होती. त्यावरुनही पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 'भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं हरिभाऊ जावळे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं होतं. मात्र ते तिकीट कापून खडसेंच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली. तेव्हा खडसेंनी जावळेंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? जग्वानी यांना देण्यात आलेलं विधान परिषदेचं तिकीट कापून खडसेंनी मुलाला उमेदवारी दिली. तेव्हा तुम्ही जग्वानी यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का?', असे प्रश्न पाटील यांनी विचारले. ...म्हणून गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं; भाजपाने सांगितलं 'राज'कारणखडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली; दोघांनी मोठीच्या मोठी यादीच वाचली

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकEknath Khadaseएकनाथ खडसेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा