देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील RSS मुख्यालयात; मोहन भागवतांशी दीड तास खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 11:30 AM2021-03-11T11:30:31+5:302021-03-11T11:37:10+5:30

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) नागपुरात दाखल झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांची भेट घेतली.

bjp leader chandrakant patil and devendra fadnavis meets rss chief mohan bhagwat in nagpur | देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील RSS मुख्यालयात; मोहन भागवतांशी दीड तास खलबतं

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील RSS मुख्यालयात; मोहन भागवतांशी दीड तास खलबतं

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील संघ मुख्यालयातमोहन भागवत आणि भैय्याजी जोशी यांच्यासोबत खलबतंदीड तास चाललेल्या बैठकीविषयी कमालीची गुप्तता

नागपूर : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) नागपुरात दाखल झाले आहेत. विमानतळावरून उतरल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय गाठले. तेथे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांची भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. (bjp leader chandrakant patil and devendra fadnavis meets rss chief mohan bhagwat in nagpur)

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सरकार्यवाह भैय्याजी जोशी हेदखील मोहन भागवत यांच्यासोबत झालेल्या बैठकीला उपस्थित होते. बंद दाराआड झालेल्या या बैठकीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असून, नेमक्या कोणत्या मुद्यांवरून आणि कोणत्या कारणासाठी सदर बैठक झाली, याबाबत माहिती मिळालेली नाही. 

स्कॉर्पिओसोबतची 'ती' गाडी मुंबईतच होती; देवेंद्र फडणवीसांचा दावा

अधिवेशनात काहीच फलित नाही

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे काहीच फलित झाले नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली झाले, असे देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. जनहिताचे मुद्दे उचलणे आमची जबाबदारी आहे, तशी वृत्तपत्रांचीही आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सामना अग्रलेखाबाबत बोलताना लगावला.

हे सरकार शेतकरीविरोधी आहे, गरीबविरोधी आहे

कोरोना वाढत असून सरकारचे त्याकडे लक्ष नाही, त्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिस्थिती भयावह आहे त्यासाठी प्रभावी योजना राबवताना दिसत नाही. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी कोरोना वाढतो, अधिवेशन सुरू झाले की कमी होतो आणि अधिवेशन संपले की तो पुन्हा वाढतो. सरकारला फक्त अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प, मराठा आरक्षण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, सचिन वाझे, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटके अशा काही मुद्द्यांचे पडसाद विधिमंडळाचे अधिवेशन जोरदार उमटले. विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरल्याचे दिसून आले. 

Read in English

Web Title: bjp leader chandrakant patil and devendra fadnavis meets rss chief mohan bhagwat in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.