स्कॉर्पिओसोबतची 'ती' गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईत होती; देवेंद्र फडणवीसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 04:49 PM2021-03-10T16:49:52+5:302021-03-10T16:51:54+5:30

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणात स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह (Mansukh Hiren Death Case) संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच या प्रकरणासंदर्भात विधानसभेत माहिती देऊन अनेक मोठे आरोप, दावे आणि विधाने केली होती.

bjp leader devendra fadnavis claims that innova car sights in mumbai yesterday | स्कॉर्पिओसोबतची 'ती' गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईत होती; देवेंद्र फडणवीसांचा दावा

स्कॉर्पिओसोबतची 'ती' गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईत होती; देवेंद्र फडणवीसांचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्कॉर्पिओसोबत दिसलेल्या इनोव्हा गाडीसंदर्भात मोठा दावामी अधिकृतपणे काही बोलू शकत नाही - देवेंद्र फडणवीस

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणात स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह (Mansukh Hiren Death Case) संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या मृत्यू प्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच या प्रकरणासंदर्भात विधानसभेत माहिती देऊन अनेक मोठे आरोप, दावे आणि विधाने केली होती. यातच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओसोबत दिसलेल्या इनोव्हा गाडीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. (bjp leader devendra fadnavis claims that innova car sight in mumbai yesterday)

विधानसभेत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाले. मुकेश अंबांनींच्या घराबाहेर स्कॉर्पिओसोबत दिसलेली इनोव्हा कार मंगळवारी संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या इनोव्हा कारसंबंधी आपल्याकडे काही माहिती आली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. 

मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटील यांचा थेट इशारा

मी अधिकृतपणे काही बोलू शकत नाही

स्कॉर्पिओसोबत दिसलेल्या इनोव्हा गाडीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यावर मी अधिकृतपणे काही बोलू शकत नाही कारण मी कोणत्याही तपासयंत्रणेचा व्यक्ती नाही. जी माहिती माझ्याकडे येते ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. माझ्या माहितीप्रमाणे एटीएसला ती गाडी कुठे आहे याची माहिती मिळाली आहे. मला वाटते त्यासंबंधी ते कारवाई करतील. त्यांच्या माहितीआधी ती गाडी तिथून गायब झाली तर वेगळी गोष्ट आहे. मात्र, माझ्या माहितीनुसार, काल संध्याकाळपर्यंत ही गाडी मुंबईतच होती, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. 

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवार, २५ फेब्रवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कारही सहभागी होती. या इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. तसेच इनोव्हा गाडीची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी तब्बल ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि ३० हून अधिक जणांच्या जबाबांनी नोंद केल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: bjp leader devendra fadnavis claims that innova car sights in mumbai yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.