शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
2
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
3
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
4
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
5
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
6
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
7
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
8
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
9
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
10
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
11
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
12
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
13
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
14
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
15
Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
16
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
17
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
18
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
19
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
20
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान

राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर, त्यांनी राजीनामा द्यावा, भाजपा नेत्याची मागणी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 20, 2020 15:46 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करताना, राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देकाही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असे देशमुख म्हणाले होते.राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांची मागणीसरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली? - आमदार अतुल भातखळकर

मुंबई - काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो वेळीच हाणून पाडण्यात आला, असा गोप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर आता भाजपामधून त्यांना लक्ष्य केले जात आहे.  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करताना, राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर म्हणाले, वाचाळवीर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नवीनच शोध लावला आहे, की राज्यातील काही आयपीएस अधिकारी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे, सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली? याची माहिती त्यांनी एवढे दिवस जनतेपासून का लपवून ठेवली? तसेच सुशांत आणि दिशा सालीयन प्रकरणात दोन महिने ज्यांना इंचभरही पुढे सरकता आले नाही, ते पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्या इतके सक्षम कसे झाले? त्यांनी असे कोणते च्यवनप्राश खाल्ले? असे सवालही भातखळकर यांनी सरकारला केले आहेत.

गृहमंत्र्यांनी पवारांकडून धडे घ्यावेत -यापूर्वी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही देशमुखांना टोला लगावला. गृहमंत्र्यांच्या बुद्धीची किव येते, गृहमंत्र्यांनी अशी वक्तव्य करताना १०० वेळा विचार करावा, ज्या अधिकाऱ्यांबद्दल ते बोलत आहेत त्या महिला आहेत. कोणत्याही महिला अधिकाऱ्याचा अपमान करणे योग्य नाही, शरद पवारांकडून गृहमंत्र्यांनी क्लासेस घ्यावेत. संजय राऊतांनीच घरचा आहेर दिला ते बरे झाले असे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रवीण दरेकर यांनी देशमुखांच्या विधानावर प्रतिक्रिया देत, राज्याच्या गृहमंत्र्यांनी असे बोलणे अपेक्षित नाही. राज्यात अशी कृत्ये करण्याची अधिकाऱ्यांची हिंमत नाही. पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत. गृहमंत्री, राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी, अशी विधाने करत आहेत, असे म्हटले आहे.

काय म्हणाले होते गृहमंत्री अनिल देशमुख?पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माझ्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.

मग नेत्यांचा काय उपयोग? - खा. संजय राऊतगृहमंत्री देशमुख यांच्या विधानाविषयी खा. संजय राऊत म्हणाले की, अधिकारी जर सरकार पाडायचे काम करू लागले तर निवडून आलेल्या नेत्यांचा काय उपयोग? महाराष्ट्रातले सरकार एवढे लेचेपेचे नाही. काही अधिकाऱ्यांविषयी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत मते सांगितली होती. काहींना ताबडतोब बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातील किती बदल झाले, हे गृहमंत्रीच सांगू शकतील असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

मास्क न लावल्याने झाली 500 रुपयांची शिक्षा, वकिलानं मागितली 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई

डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच पकडलं विषाचं पाकीट

केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य

भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन 

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार