शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : "राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?"; भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 14:13 IST

BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Rajesh Tope Over Corona Vaccine : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरून आता आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

मुंबई: राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला असताना जालना जिल्ह्यात मात्र लसींचा अधिकचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्याला १० दिवस पुरेल इतका अतिरिक्त साठा उपलब्ध आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेजालना जिल्ह्याचे आहेत. लसींचा तुटवडा असल्यानं राज्याच्या अनेक जिल्ह्यांत लसीकरण मोहीम थांबवावी लागली असताना आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र लसींचा मुबलक साठा असल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्रानं दिलं आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी यावरून आता आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?" असा सवाल भाजपाने विचारला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "केंद्राकडून मिळालेल्या २६.७७  लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला १७ हजार ऐवजी ६० हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?..." असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

डॉ. राजेश टोपे विधानसभेत जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्न करतात. ३१ मार्चला केंद्राकडून राज्याला २६.७७ लाख लसींचे डोस मिळाले. यापैकी ६० हजार डोस जालना जिल्ह्याला मिळाले. विशेष म्हणजे जिल्ह्याचा कोटा १७ हजार इतकाच होता. मात्र प्रत्यक्षात त्याच्या तिपटीहून अधिक डोस जिल्ह्याला मिळाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोपेंनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना स्वत:च्या जिल्ह्याला अधिकचा लस पुरवठा करण्यास सांगितलं होतं. मात्र लसींच्या पुरवठ्यात कोणत्याही जिल्ह्याला प्राधान्य दिलं गेलं नसल्याचा दावा टोपेंनी केला. 

राज्यात कोरोना लसींचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात मात्र १० दिवसांचा साठा

जालना जिल्ह्याला लसीचे अधिकचे डोस मिळाले असल्यास ते लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी दिले गेले असावेत, असंदेखील टोपे पुढे म्हणाले. लसीकरणचा वेग वाढवण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि उपकेंद्रांना लसींचं वाटप केलं आहे, असं टोपेंनी सांगितलं. राज्याच्या तुलनेत जालन्यातील लसीकरणाचा वेग कमी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील इतर जिल्ह्यात सरासरी २७ टक्के लोकांचं लसीकरण होत असताना जालन्यात मात्र हीच टक्केवारी १८.१ टक्के असल्याची आकडेवारी टोपेंनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपेJalanaजालनाMaharashtraमहाराष्ट्र