काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं देशात सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना परवानगी दिली. त्यानंतर १६ जानेवारीपासून देशात लसीकरम मोहिमेला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही मोहीम सुरू करण्यात आली. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कोणत्या राज्यानं आतापर्यंत किती जणांना लस दिली याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हा आठव्या क्रमांकावर आहे. यावरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे."कोविडची लस तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडुले सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू असून या यादीत ठाकरे सरकारचा क्रमांक ८ वा आहे. फक्त टक्केवारीत नंबर वन," असं म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला.
ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; भाजप नेत्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 11:51 IST
१६ जानेवारीपासून देशभरात सुरू करण्यात आली आहे लसीकरण मोहीम
ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; भाजप नेत्याचा आरोप
ठळक मुद्दे१६ जानेवारीपासून देशभरात सुरू करण्यात आली आहे लसीकरण मोहीमलसीकरणात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर तर कर्नाटक पहिल्या स्थानी