शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

"उद्धवजी लक्ष देत नसतील तर राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे; दोघांची वैचारिक उंची सारखीच"

By जयदीप दाभोळकर | Updated: January 11, 2021 14:11 IST

भाजपा नेत्याचा जोरदार टोला

ठळक मुद्देसामनातील अग्रलेखावरून साधला निशाणा नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा असं म्हणत शिवसेनेनं केली होती टीका

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. "उद्धवजी अगदीच लक्ष देत नसतील तर संजय राऊतांनीराहुल गांधींना सल्ले द्यावेत. मोदीद्वेषाचा कॉमन फॅक्टर आहेच. शिवाय दोघांचे विचार आणि वैचारिक उंची सारखी आहे," असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला. "इतिहास साक्षी आहे ज्या पत्रकारांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषातून मोदींचा विरोध केला, जनतेने त्यांचा बाजार उठवला. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, जनता जनार्दनाची सेवा करून तिसाऱ्यांदाही होतील," असं भातखळकर म्हणाले.  "नेहरूंनी केलेली कामे (की कांड) निस्तारण्यासाठीच जनतेने मोदींना दुसऱ्यांदा प्रचंड समर्थन देऊन पंतप्रधान बनवले. संजय राऊतांसारख्या बोरूबहद्दरांच्या मतांना मोदी किंमत देत नाहीत हे देशाचे भाग्य. नेहरूंनी जसं काश्मीरचा मुद्दा केला. चीनच्या समोर शरणागती पत्करली, तसं मोदींनी करावं असं संजय राऊतांचं म्हणणं दिसतंय. पंतप्रधान नेहरू होते म्हणून देशाच्या आरोग्य व्यवस्थेचीही वाट लागली. ७० वर्षांनंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींना शौचालय बांधण्यापासून काम करावं लागलं. मुंबईत काय घडतंय महाराष्ट्रात काय होतंय याकडे पहिलं लक्ष द्या. मुंबई महानगरपालिकेत तुमची अनेक वर्ष सत्ता आहे. तिकडे ४० हून अधिक रुग्णालयं बेकायदेशीरपणे काम करतायत. ६० रुग्णालयांचं फायर ऑडिटही झालेलं नाही. त्यामुळे मोदी आणि अमित शाह यांना सल्ले देण्यापेक्षा स्वत:च्या पायाखाली काय जळतंय हे पाहा," असंही ते म्हणाले. "देवेंद्र फडणवीस हे भंडाऱ्याला गेल्यानंतर तुमच्या घरबशा मुख्यमंत्र्यांना नाईलाजानं का तिकडे जावं लागलं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्वीट केल्यानंतर १० मिनिटांनी त्यांना ट्वीट करावंस वाटलं. त्यामुळे राज्य कारभारात लक्ष द्या आणि फुकटचे सल्ले देणं बद करा," असंही भातखळकर यांनी नमूद केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतAtul Bhatkalkarअतुल भातखळकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा