शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

“देवेंद्रजी मुख्यमंत्री अन् एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचं सरकार”; भाजपचे साईचरणी साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 19:09 IST

भाजपची खेळी असण्याचा प्रश्नच नाही. राज्यसभा, विधानपरीषद निवडणुकीत खदखद बाहेर पडली, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

शिर्डी: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. शिवसेनेने परत येण्यासाठी अल्टिमेटम दिलेले आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. उलटपक्षी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत असून, शिवसेनेतील आणखी काही आमदार गुवाहाटीला गेल्याचे समजते. दुसरीकडे, भाजपच्या काही नेत्यांनी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, याबाबत साईचरणी साकडे घातले.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभेचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी शिर्डीत हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे त्यांनी साईचरणी घातल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मतदारसंघासाठी निधी मिळत नसल्याने शिवसेना आमदारांमध्ये खदखद होती. निधी मिळत नसल्याचे अनेक शिवसेना आमदारांनी बोलून दाखवले. मुख्यमंत्री त्यांचा असताना निधी मिळत नसेल तर सेना आमदारांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्या सर्व आमदारांना मनापासून शुभेच्छा असे कथोरे यांनी म्हटले आहे. 

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ताकदवान नेते

भाजप ज्या दिवशी सत्ता स्थापन करेल त्यादिवशी आणखी आमदार जोडले जातील. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ताकदवान नेते आहेत. ४० पेक्षा जास्त आमदार त्यांच्या बरोबर आहेत. मग शिवसेना राहिली कुठे? शिवसेनेत किती खदखद आहे हे आता स्पष्ट झाले आहे. ही भाजपची खेळी असण्याचा प्रश्नच नाही. राज्यसभा, विधानपरीषद निवडणुकीत त्यांची खदखद बाहेर पडली. हे सरकार पाडू असे फडणवीस कधीही म्हणाले नाही. त्यांच्या कर्माने हे सरकार पडेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि ते पडलेय, असे चित्र आहे, असे कथोरे म्हणाले. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. आमच्याकडे सुमारे ४५ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे आता आम्ही शिवसेना आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार पुढे जात आहोत, असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाshirdiशिर्डी