शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

"थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या अन् एखादा चमचा..."; संजय राऊतांवर भाजपाचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:05 IST

Shivaji Maharaj Statue, Sanjay Raut vs BJP: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर

Shivaji Maharaj Statue, Sanjay Raut vs BJP: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. "राज्यात सध्या जे वातावरण आहे, ते पाहता राज्याला गृहमंत्री आहे का? असेल तर एवढा दुबळा कसा? असा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीसांना स्वतःला गृहमंत्री म्हणवून घेण्याचा अधिकार नाही," असे टीकास्त्र राऊतांनी सोडले. या टीकेला भाजपाकडूनही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

"काँग्रेसपुढे कण्यातून वाकलेले आणि स्वहस्ते पक्षाची शकले केलेले जेव्हा दुसऱ्यांना हिणवण्याचे शाब्दिक चाळे करतात, तेव्हा हसून दुर्लक्ष करणंच योग्य असतं. संजय राऊत, तुम्हीच थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या आणि एखादं-दुसरा चमचा उद्धवजींना पण द्या. लाचारीच्या विषाणूने तसेही तुम्ही अशक्त झाला आहात. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुम्ही टिकाव धरण्याची शक्यता नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सशक्त आहेत की अशक्त, याची उठाठेव करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सलाईनवर का गेलाय?, याचं आत्मपरिक्षण करा," अशा शब्दांत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

"माफी मागून असा विषय मिटतो का? मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजे. मग काय आम्ही चाळीस गद्दारांना माफी द्यायची का? सरकारच्या गळ्याशी आल्याने, तोंड दाखवायला जागा नसल्याने असे बोलतायत की मुख्यमंत्र्यांची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे. नुसत्या माफीला काही अर्थ नाही. या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कुणाची होती हे तुम्ही जाहीर करा. नंतर माफी मागा," असा खोचक सल्ला राऊतांनी मुख्यमंत्र्याना दिला होता.

"तुमच्या राज्याच्या वर्दीच्या लोकांवर कोकणातले गुंड धावून जातात. तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही. तुम्ही कसे गृहमंत्री? सरकारची लाज गेली आहे. ती चारही बाजूंनी सील करून परत येणार नाही. प्रधानमंत्री कायम मौनात असतात. जिथे चमकायला मिळते, तिथे बरोबर येतात. ते येणार असतात तेव्हा चार-चार हेलिपॅड बांधली जातात. एरवी शिवजयंतीला ते ट्विट करतात. पण पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी लगेच एकही ट्विट केले नाही," याकडे राऊतांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे