शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Keshav Upadhye : "मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, इतके अनर्थ पदाच्या लोभाने केले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 11:26 IST

BJP Keshav Upadhye Slams ShivSena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता. त्यावरून आयोगाने दोन्ही गटाकडून आवश्यक कागदपत्रे मागवली. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. परंतु कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे आयोगाने तात्पुरतं दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असं स्पष्ट केले आहे. यानंतर आता भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

"मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, इतके अनर्थ पदाच्या लोभाने केले" असं म्हणत भाजपानेउद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले, सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला, इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले" असं उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही म्हणणाऱ्या युवराजांचा पक्ष, चिन्ह इतिहासात जमा"

मनसेने शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.  आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धनुष्य बाण चिन्ह गोठवल गेलंय, या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही... आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार आहे... संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा..." असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"

केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले तेव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले! निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले कारण उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या मागे लागून एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले!" असं आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे