शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Keshav Upadhye : "सत्तेची धुंदी आणि पदाची नशा डोक्यातून उतरवणं कठीण; तुमच्या सत्तेचा ढाचा भाजपाच पाडणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:58 IST

BJP Keshav Upadhye And Uddhav Thackeray : भाजपाने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

मुंबई - भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा पुरता फाटल्याने त्यांचा भेसूर चेहरा समोर आला असून, विकृत, विखारी अन् गळेकापू राजकारण भाजप करीत असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमधील प्रचंड जाहीर सभेत केला. देवेंद्र फडणवीसांना मुंबई स्वतंत्र करायची आहे, तीच त्यांच्या मालकांची इच्छा आहे; पण तुमच्या मालकासकट कोणीही आले तरी हौतात्म्य पत्करून मिळविलेल्या मुंबईचे लचके तोडणाऱ्यांचेच तुकडे होतील, असा इशाराही त्यांनी दिला. यानंतर आता भाजपानेशिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"सत्तेची धुंदी, पदाची नशा डोक्यातून उतरवणं कठीणच आहे. त्यामुळे तुमच्या सत्तेचा ढाचा भाजपाच पाडणार आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "देवेदेंजींनी गोरेगावच्या सभेतून शिवसेनेची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उरली सुरलीही काढून घेतली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कुणाच्या बापाची हिंमत नाही असं सांगत उद्धव ठाकरेंच्या ‘टोमणे बॉम्ब’चा फुसका ठरवला. मुळात शिवसेनेने केवळ मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे."

"बाळासाहेबांचे स्वप्न औरंगाबादचं संभाजीनगर झाल्याचं होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी नामांतराची गरजच काय म्हणत बाळासाहेबांच्या स्वप्नाचा अपमान केला. ‘सामना’वीरांनीही उद्धव ठाकरेंचे टोमणे असल्याचं खुद्द अग्रलेखात मान्य केले आहे. सत्तेची धुंदी आणि पदाची नशा डोक्यातून उतरवणं कठीणच आहे. त्यामुळे तुमच्या सत्तेचा ढाचा भाजपाच पाडणार आहे. #शिवसेना #भाजपा #बाळासाहेब_ठाकरे #संभाजीनगर #सामना #देवेंद्रफडणवीस #टोमणे #टोमणेबॅाम्ब" असं उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच सामनावीरांनाही_टोमणेसभा_मान्य आणि बाळासाहेबांच्या_स्वप्नांचा_अपमान हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा