शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"'नवाबी' पत्रपरिषदांना एकच पण 'सॉलिड' उत्तर दिलं; आता तुम्हीच ठरवा चिखलात कोणाला लोळवलं?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 12:58 IST

BJP Keshav Upadhye Slams Nawab Malik : भाजपाने नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सत्य हे अस्तित्वातच असतं. असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं" असं सणसणीत टोला लगावला आहे.

मुंबई - अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची फटाकेबाजी दिवाळीनंतरही सुरूच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले, असा आरोप मलिक यांनी बुधवारी केला. तर त्यावर फडणवीस यांनी ‘एखाद्यासोबत चिखलात पडून नादी लागू नये. तुमच्या अंगाला घाण लागते आणि समोरच्याला मात्र घाणीत खेळायला आवडते,’ अशा शब्दांत उत्तर दिले. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी "चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला, बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला" असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे ट्विट केलं आहे. याला आता भाजपाने उत्तर दिलं आहे. 

भाजपाने नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सत्य हे अस्तित्वातच असतं. असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं" असं सणसणीत टोला लगावला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी "'नवाबी' पत्रपरिषदांना एकच पण 'सॉलिड' उत्तर दिलं; आता तुम्हीच ठरवा चिखलात कोणाला लोळवलं?" असा सवाल विचारला आहे. केशव उपाध्ये यांनी "सत्य हे अस्तित्वातच असतं! असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं... म्हणूनच ३० वर 'नवाबी' पत्रपरिषदांना एकच पण 'सॉलिड' उत्तर दिलं गेलं! आता तुम्हीच ठरवा चिखलात कोण लोळत होतं? (तसंही रोज सकाळी दिसला बुम की चिखलफेक करत हे अख्ख्या महाराष्ट्राला ठावूक आहेच की)" असं म्हटलं आहे. 

फडणवीसांनी दिले मलिकांनी केलेल्या आरोपांना उत्तर

प्रख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक वाक्य ट्विट करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांची खिल्ली उडविली. या आरोपांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.‘मी फार पूर्वीच शिकलो की, एखाद्यासोबत चिखलात पडून नादी लागू नये. तुमच्या अंगाला घाण लागते आणि त्याला मात्र घाणीत खेळायला आवडते’ हा जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या वाक्याचा आशय फडणवीस यांनी ट्विट केला. मलिक यांनी आरोपांची घाण उडविली असली तरी आपण त्याला उत्तर देणार नाही, असे फडणवीस यांनी सूचित केले. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मलिक यांच्या आरोपांना आशिष शेलार यांनी समर्पक उत्तर दिलेले आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व या आरोपांना देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

केशव उपाध्ये यांनी याआधी "अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काहीजणांना पकडले. याबाबत राज्याचे अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच" असं म्हटलं आहे.

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण