'खडसेंसाठी भाजप म्हणजे जीना यहाँ, मरना यहाँ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 10:18 IST2018-06-15T10:18:11+5:302018-06-15T10:18:11+5:30
देशाचे पंतप्रधान जर ओबीसी आहेत, तर खडसेंवर अन्याय कसा होऊ शकतो ?

'खडसेंसाठी भाजप म्हणजे जीना यहाँ, मरना यहाँ'
नाशिक: एकनाथ खडसे आणि भाजपाचे नाते म्हणजे 'जीना यहाँ, मरना यहाँ', अशाप्रकारचे असल्याचे विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते गुरुवारी नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ खडसे पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ खडसेंनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांच्यासाठी भाजपा म्हणजे त्यांचे 'जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा' असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान जर ओबीसी आहेत, तर खडसेंवर अन्याय कसा होऊ शकतो ? एकनाथ खडसे यांच्या नाराजीसंदर्भात मी त्यांच्याशी संपर्क साधणार असल्याचेही मुनगंटीवरांनी सांगितले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काल वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल आले होते. दुपारी त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.