शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मोदींच्या नावाशिवाय भाजपाकडे काहीच नाही, फार तर ६० जागा येतील; जयंत पाटील यांचं 'संदर्भासहित स्पष्टीकरण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 18:53 IST

राज्यात जे काही सुरु आहे त्याबद्दल जनतेच्या मनात चीड आहे. हाच राग विधानसभेच्या निवडणुकीत मतपेटीतून उतरणार आहे असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांनी मतदान केले. त्याचा अर्थ राज्यातील सुशिक्षित मतदार हा महाविकास आघाडीच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढलो तर पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा नक्कीच पराभव होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

जयंत पाटील म्हणाले की, पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपाला ५० किंवा फार तर ६० जागा मिळतील. भाजपाकडे मोदींच्या नावाशिवाय काहीच नाही. राज्यात जे काही सुरु आहे त्याबद्दल जनतेच्या मनात चीड आहे. हाच राग विधानसभेच्या निवडणुकीत मतपेटीतून उतरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येईल. येणाऱ्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढतील असंही त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ मराठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

तसेच सध्याचा सत्तारुढ पक्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतेय. निवडणुका घेण्याचं धाडस नाही. २०२४ च्या निवडणुका लोकसभेसोबत होतील तेव्हा ज्या घटना राज्यात घडल्या त्या न विसरता लोक मतदान करतील. त्यामुळे भाजपाने मिशन २०० ऐवजी मिशन १०० केले तरी चालण्यासारखे आहे. आम्हाला आघाडीत ज्या जागा वाट्याला येतील त्यात राष्ट्रवादी चांगला स्टाईक रेट करेल. आमची संख्या पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्रिपदावर चर्चा होईल असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण?महाविकास आघाडीचा निवडणुकीत चांगला स्ट्राईक रेट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबळावर ठरेल. जर संख्याबळ राष्ट्रवादीकडे आले तर मुख्यमंत्री कोण असेल हे पवार साहेब ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

जयंत पाटलांनी केलं कौतुक

  • संजय राऊत चांगले संपादक, मनमोकळेपणाने जे असेल ती भूमिका मांडतात. दिलदार वृत्तीचे मित्र आहेत. संजय राऊतांमध्ये कुठलेही अवगूण नाहीत. 
  • अजित पवार रोखठोक बोलतात, आग्रहाने काम करतात. सकाळी लवकर दिवस सुरू करणे, वेळेवर येणे. 
  • राजकारणातील सगळे बारकावे कमी वयात देवेंद्र फडणवीस यांनी आकलन करतात. योग्य वेळी योग्य वृत्ती करण्याची कसोटी आहे. साम्यजंस्याने समतोल साधत काम करण्याची सवय चांगली आहे. 
  • उद्धव ठाकरेंचा स्वभाव समंजस्य आहे. कुठल्याही गोष्टीतील बारकावे लगेच शिताफीने हेरतात. चांगले आणि आदर्श नेते वाटतात. एकदा एखादी गोष्ट मनात आली तर तो गैरसमज त्यांच्या मनातून निघत नाही. 
  • राज ठाकरेंशी फारशी ओळख नाही. राज ठाकरेंना टीव्हीवर पाहतो. त्यांच्या भाषणाला लोक गर्दी करतात. नेत्यांची मिमिक्री करतात ते आवडते. भाषण चांगले करतात. 
  • एकनाथ शिंदे यांच्यात कष्ट करण्याची सवय जास्त आहे. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध असतात.  
टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस