शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपवाल्यांना राममंदिरावर बोलण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 05:35 IST

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले. निवडणुकीला वेळ आहे. निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र राहू असे ते म्हणाले.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपवाल्यांना राममंदिरावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. अयोध्येत जे घडले त्यावेळी हे बेपत्ता होते. आज कोरोनाची संचारबंदी आहे तसे त्यावेळी शांत होते. एकट्या शिवसेनाप्रमुखांनीच गर्जना केली होती, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शुक्रवारी टीका केली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आपल्याला अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनासाठी बोलावतील अशी अपेक्षा होती का या प्रश्नात ते म्हणाले की भूमिपूजन होईल याचीच मला कल्पना नव्हती. आता त्यांनी मुहूर्त काढला आहे तर मंदिराची उभारणी लवकर करावी. मी मुख्यमंत्री होण्याआधी आणि नंतरही अयोध्येला गेलो आणि आणखीही जाईन.

भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रातील मंदिरे राममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी (५ आॅगस्ट) उघडी ठेवावीत अशी मागणी केली आहे याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, कोणाची काहीही मागणी असेल पण जनतेच्या काळजीचा विचार करून योग्य तेच मी ठरवीन. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे अशी मागणी पूर्ण करता येणार नाही. तसेही त्यांना राममंदिरावर बोलण्याचा काही अधिकार नाही. अयोध्येतील घटनेच्या वेळी ते तोंडाला मास्क न लावता गप्प बसले होते. आपण मातोश्रीच्या बाहेर का पडत नाही, असे विचारले असता ते म्हणाले, मातोश्री मी कधीही सोडणार नाही.तंत्रज्ञानाचा वापर करून मी राज्यभर संपर्कात आहे, निर्णयांची अंमलबजावणी करतोय. काम न करता फिरणं यापेक्षा न फिरता काम करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलीस नीट तपास करीत नसल्याची टीका आता बिहारमधील नेते करू लागले आहेत, भाजपचे नेतेही आरोप करीत आहेत यावर मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात आमचे पोलीस कोरोनाचे बळी ठरत असताना त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करणाऱ्यांची मी निंदा करतो. तपास योग्य दिशेने सुरू आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले. निवडणुकीला वेळ आहे. निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र राहू असे ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाRam Mandirराम मंदिर