'भाजपाने केली कमाल, युती करून दोघांनी करावी धमाल' - आठवले

By Admin | Updated: February 24, 2017 23:55 IST2017-02-24T23:55:36+5:302017-02-24T23:55:36+5:30

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करणार

'BJP has done great, coalition alliance should do everything' - Athavale | 'भाजपाने केली कमाल, युती करून दोघांनी करावी धमाल' - आठवले

'भाजपाने केली कमाल, युती करून दोघांनी करावी धमाल' - आठवले

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. यावेळी बोलताना आठवलेंनी खास त्यांच्या शैलीत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. ‘भाजपाने केली कमाल, आता सेनेसोबत युती करून दोघांनी करावी धमाल.’असं ते म्हणाले. 
 
शिवसेना-भाजपाच्या युतीसाठी मी पुढाकार घेईन. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंना युतीसाठी आवाहन करणार आहे, दोघांनी एकत्र येऊन अडीच-अडीच वर्ष महापौर पद वाटून घ्यावं, तसंच इतर पदंही वाटून घ्यावी असं आठवले पुढे म्हणाले.  
 
भाजपाने मिळवलेल्या यशामध्ये आमचाही मोठा वाटा आहे असंही आठवले म्हणाले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.  मुंबई महापालिकेत सत्तास्थापनासाठी सध्या शिवसेना आणि भाजपाकडून रस्सीखेच सुरू आहे.  
 

Web Title: 'BJP has done great, coalition alliance should do everything' - Athavale