शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Girish Mahajan : "तुम्हाला खूप वाटतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं पण…"; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 11:52 IST

BJP Girish Mahajan Slams NCP Eknath Khadse : गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपाचे नेते गिरीश महाजन (BJP Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Eknath Khadse) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "खडसेंना खूप वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण जनतेला ते वाटायला हवंना" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच खडसेंनी एकदा आत्मपरीक्षण करावे असं महाजनांनी म्हटलं आहे. "भाजपा हा केवळ वाणी, ब्राह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा बहुजनांचा पक्ष आहे, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना खोचक टोला लगावला आहे.

"एकनाथ खडसे जे बोलले ते बरोबरच बोलले. कोण म्हणतं आमचा पक्ष हा वाणी, ब्राह्मणांचा आहे. आमचा पक्ष मुळातच बहुजनांचा आहे. आमचे 105 आमदार असतील, आमच्याकडे इतक्या मोठ्या संख्येनं खासदार आहेत, एवढेच काय आमचे सर्व पदाधिकारी आणि मंत्री सुद्धा बहुजनांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये कुठेही ब्राह्मण किवा वाणी समाजाची संख्या अधिक नाही. मात्र एकनाथ खडसेंनी बोलताना हे लक्षात घ्यावे, की माणूस हा नुसता जातीने आणि समाजामुळे मोठा होत नाही" असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

"खडसेंनी एकदा आत्मपरीक्षण करावं"

"खडसेंनी एक लक्षात घ्यावं माणूस हा केवळ जाती, धर्मामुळे मोठा होत नाही तर तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि नेतृत्व क्षमतेमुळे मोठा होतो. कोणीही सांगेल, अवघा महाराष्ट्र सांगेल की देवेंद्र फडणवीस यांची क्षमता काय आहे ती? खडसेंना खूप वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण जनतेला ते वाटायला हवंना. त्यामुळे खडसेंनी एकदा आत्मपरीक्षण करावं. हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे" असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस